आताच शेअर करा

दिनांक:१७/११/२०२६

निरवडे : सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावातील चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

यामध्ये सावंतवाडी-शिरोडा रस्ता ते निरवडे पलताडवाडी, पलताडवाडी ते बाईतवाडी, शिरोडा रस्ता ते विष्णुप्रसाद सोसायटी तसेच भाईडवाडी ते शेटकरवाडी या चार रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांच्या कामांमुळे गावातील नागरिकांची दळणवळणाची सोय अधिक सुलभ होणार असून ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यावेळी निरवडे सरपंच सुहानी सुहास गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्र गावडे, ज्येष्ठ ग्रामस्थ लाडू गावडे, सुहास गावडे, सुभाष गावडे, नामदेव गावडे, धर्मा माळकर, नारायण माळकर, बाळ्या बाईत, उमाकांत गावडे, अक्षय गावडे, सूरज गावडे, साहिल परब, साबाजी गावडे, बादल गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी गावाच्या वतीने सरपंच सुहानी गावडे यांनी आमदार दीपकभाई केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आणि शिवसेना युवा नेते सूरज परब यांचे विशेष आभार मानले. गावाच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे महत्त्वाच्या रस्त्यांची कामे मार्गी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed