आताच शेअर करा

दिनांक:१८/११/२०२६

न्हावेली /वार्ताहर
   न्हावेली येथील सुप्रसिद्ध वैद्य शशिकांत परब उर्फ कांता वेंगुर्लेकर यांना आज, १८ नोव्हेंबर रोजी गोवा मेडिकल कॉलेज (जीएमसी), बांबोळी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्मिळ अशा ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटाच्या रक्ताची तातडीने आवश्यकता होती. यावेळी आरोस येथील रसिक दळवी यांनी तत्परता दाखवत जीएमसी बांबोळी येथील रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले.
    रसिक दळवी हे ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे नियमित आणि नेहमीच मदतीसाठी तत्पर असणारे रक्तदाते आहेत. त्यांनी केलेले हे अकरावे रक्तदान ठरले. दुर्मिळ रक्तगटाची गरज ओळखून वेळेत धाव घेत त्यांनी केलेल्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.दरम्यान, ही रक्तदानाची गरज पूर्ण होण्यासाठी ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे आणखी एक दुर्मिळ रक्तगटाचे रक्तदाते गजानन दळवी (रा.न्हावेली) यांनी विशेष प्रयत्न केले.त्यांच्या सहकार्याबद्दलही संस्थेने आभार व्यक्त केले.ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी रसिक दळवी यांच्या या सेवाभावी कार्याचे विशेष कौतुक केले.रक्तदानातून माणुसकी जपणाऱ्या रसिक दळवी यांच्या कार्याला संस्थेतर्फे मानाचा मुजरा करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed