आताच शेअर करा

दिनांक: ०२/०४/२०२६

सावंतवाडी: महाराष्ट्र राज्यातील सर्व फार्मर्स प्रोड्युसर कंपनींची राज्यस्तरीय परिषद दिनांक 30 मार्च रोजी मुंबई नरिमन पॉईंट मध्ये कैलासवासी यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये संपन्न झाली .महाराष्ट्रातील सुमारे 600 हून अधिक शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक या परिषदेत उपस्थित होते .पणन व सहकार मंत्री श्री नामदार जयकुमार रावल साहेब यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले त्यांच्या समवेत प्रधान सचिव श्री दराडे कार्यकारी संचालक श्री कदम सर व्यवस्थापक विनायक जी कोकरे व रत्नागिरी विभाग पणन चे श्री मिलिंद जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते .फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या संदर्भात तांत्रिक कार्यशाळेचे विविध विषयांवर गांभीर्याने तज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन झाले .अनेक यशवंत शेतकरी उत्पादक संघाच्या यशगाथा त्या त्या कंपनीने मांडल्या .या परिषदेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पण मंत्री माननीय श्री जयकुमार रावल साहेब यांनी सकाळी अकरा वाजता उद्घाटन केल्यानंतरही संपूर्ण दिवस कार्यशाळेत स्वतः उपस्थित राहून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या समस्या जाणून घेतल्या आभार प्रदर्शनानंतर अनेक शेतकरी कंपन्यांना भेटून चर्चा केली .हे एकमेव मंत्री की जे दिवसभर शेतकऱ्यांसमवेत उपस्थित होते .सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सिंधुदुर्ग बागायतदार प्रोडूसर कंपनीचे संचालक श्री विलास सावंत डिंगणे -सावंतवाडी व संचालक श्री चंद्रशेखर देसाई शिरवल -दोडामार्ग हे उपस्थित होते .प्रास्ताविकामधून महाराष्ट्रातील 14 हजार शेतकरी उत्पादक कंपन्यांमधील सुमारे 70 ते 80 टक्के कंपन्या या अनेकविध कारणांमुळे बंद पडले आहेत किंवा मागे पडल्या आहेत यावरही चर्चा करण्यात आली .शासनाकडून योग्य ते मार्गदर्शन योग्य वेळी न मिळाल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे या परिषदेत सिद्ध झाले .त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यातील फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने एकत्र करून त्यांच्या समस्या निवारण करण्यासाठी दर महिन्याला कार्यशाळा घेण्यात यावी अशी मागणी सिंधुदुर्ग बागायतदार प्रोडूसर कंपनीचे श्री विलास सावंत व श्री चंद्रशेखर देसाई यांनी केली .कंपनी ॲक्टमधील शेतकरी कंपन्यांना जीएसटीतून वगळण्यात यावे व नाबार्ड किंवा इतर शासकीय संस्थांकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीसाठी पणन कडून एक पथक तयार करावे व त्या पथकाकडून त्या त्या शेतकरी कंपन्यांना मार्गदर्शन व्हावे अशीही मागणी सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीकडून करण्यात आली .माननीय पणन व सहकार मंत्री श्री रावल साहेब यांनी शेतकऱ्यांच्या अनेक सूचना गांभीर्याने घेऊन त्या प्रकारे सुधारित प्रस्ताव करण्याचे आदेश प्रशासनास दिले .त्यामुळे प्रशासकीय कारणामुळे आजारी पडलेल्या अनेक शेतकरी कंपन्यांना शासकीय गोष्ट मिळण्याची आशा निर्माण झाली असून त्यामुळे शेतकरी कंपन्या आणखी मजबूत व स्वायत्त होऊन शेतकऱ्यांचे हित जपण्यास मदत होईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *