आताच शेअर करा

दिनांक: १९ /०२/२०२६

बांदा: बांदा ग्रामपंचायत उपसरपंचपदी रत्नाकर आगलावे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच आबा धारकर यांचा एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर आज झालेल्या बांदा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये रत्नाकर आगलावे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच प्रियांका नाईक, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, प्रशांत बांदेकर, श्रेया केसरकर, राजाराम बाळू सावंत, तनुजा वराडकर, रेश्मा सावंत, ग्रामपंचायत अधिकारी आदम शहा उपस्थित होते.
      
♦️रत्नाकर आगलावे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत, पंचायत समिती सदस्य महेश धुरी, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर,माजी उपसभापती शीतल राऊळ,भाजप शहर अध्यक्ष बाबा काणेकर, भाजप प्रभारी मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, महिला शहराध्यक्ष भाजप स्मिता पेडणेकर, वाफोली उपसरपंच विनेश गवस, यांनी शुभेच्छा दिल्या.
   
♦️यावेळी नारायण आकेरकर,निलेश नाटेकर, शैलेश केसरकर, अपर्णा आगलावे, वर्षा आगलावे, सौरभ आगलावे, साहिल आगलावे, मनोज सावंत, नारायण गावडे, नाना सावंत भाई म्हाडगुत, दर्पण आळवे, सिद्धेश महाजन, माधवी गाड, शुभम कवठणकर, सुनील दाधामापूरकर,ह बाळा पेडणेकर, हेमंत मोर्ये, रीना आगलावे, फालतिन वालतीन आल्मेडा, केदार कणबर्गी, उपस्थित होते.तसेच ग्रामपंचायत कर्मचारी लिपिक संजय सावंत, संतोष कविटकर, सोनिया सातार्डेकर, अनुज देसाई आदी कर्मचारी उपस्थित होतै.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *