आताच शेअर करा

दिनांक: १८/०२/२०२६

बांदा : प्रतिनिधी
पाडलोस गाव ग्रूपच्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त तीन दिवस विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रमांची आकर्षक रूपरेषा जाहीर करण्यात आली असून सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन पाडलोस गाव ग्रुपचे अध्यक्ष प्रणित गावडे यांनी केले आहे.
गुरुवारी १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वा. ग्रामपंचायत पाडलोस येथे कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने होणार आहे. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल. महिलांचे समूहगीत, मुलांची भाषणे, महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ तसेच फनी गेम्स आयोजित करण्यात आले आहेत. त्यानंतर ग्रामपंचायत पाडलोस ते शीतलवाडी अशी शिवाजी महाराजांची भव्य रॅली काढण्यात येणार आहे.
शनिवारी २१ फेब्रुवारी रोजी रात्री ७.३० वा. श्री देव रवळनाथ रंगमंच येथे वेशभूषा स्पर्धा (लहान व मोठा गट), विद्यार्थ्यांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच क्रीडास्पर्धेचा बक्षीस समारंभ यावेळी पार पडणार आहे.
रविवारी २२ फेब्रुवारी रोजी रात्री ७.३० वा. खेळ ‘पैठणीचा’ हा विशेष कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करण्यात आला आहे.
एकूणच पाडलोस येथे यंदाची शिवजयंती उत्सव सर्व ग्रामस्थांच्या सहभागातून विशेष रंगतदार ठरणार असे पाडलोस गाव ग्रुपचे अध्यक्ष प्रणित गावडे, उपाध्यक्ष राजा आंबेकर, सचिव अमेय गावडे, खजिनदार बापू माधव यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *