
दिनांक: ६ डिसेंबर २०२५
बांदा: प्रतिनिधी
इन्सुली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार दिनांक ०६ डिसेंबर रोजी होणार आहे. या निमित्ताने सकाळी श्री देवी माऊलीची पूजा, अर्चा त्यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे.त्यानंतर नवस बोलणे नवस फेडणे. तसेच दुपारी मान्यवरांच्या हस्ते श्री देवी माऊली दिनदर्शिकेचे प्रकाशन होणार आहे.रात्री पालखी प्रदक्षिणा होणार असून रात्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा प्रयोग होणार आहे तरी सर्व भाविकांनी ग्रामस्थांनी या जत्रोसवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष देवस्थान समिती, ग्रामस्थ व मानकरी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
