
दिनांक: ६ डिसेंबर २०२५
तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे
तळवणे:गुरुवर्य बी. एस. नाईक मेमोरियल ट्रस्ट संचलित इंग्लिश मीडियम स्कूल तळवडेच्या विद्यार्थ्यांनी ५३ व्या सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात घवघवीत यश संपादन केले. या प्रदर्शनांतर्गत आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत इयत्ता ६ वी ते ८ वी या गटात प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या स्पर्धेत इयत्ता आठवीतील कु. वेदांत उदय पाटकर तर इयत्ता सातवीतील कु. पियुष संजय परब हे विद्यार्थी सहभागी झाले होते. यशस्वी विद्यार्थ्यांना लाभलेले त्यांचे गुरु म्हणजे प्रशालेच्या शिक्षिका प्रियांका गावडे व सुखदा कुंभार. या दोन्ही शिक्षिका त्यांच्या यशाच्या तेवढ्याच भागीदार आहेत. ही स्पर्धा संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे आयोजित करण्यात आलेली होती.
या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उत्तुंग यशाचे सर्व स्तरावर कौतुक केले जात आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक अजय बांदेकर, उपमुख्याध्यापक सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
