
दिनांक: २९ नोव्हेंबर २०२५
सावंतवाडी: सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६
प्रभाग क्रमांक ५ चे
भाजप उमेदवार सुधीर आडिवरेकर आणि दुलारी रांगणेकर यांच्या समर्थनार्थ आयोजित संवाद सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या सभेला मुस्लिम बांधव मोठ्या संखेने उपस्थित राहिले आणि उमेदवारांशी थेट संवाद साधला.
युवा नेते विशाल परब आणि सौ. वेदिकाताई परब यांनी परिसरातील बांधवांशी थेट संवाद साधला. सावंतवाडीचा सर्वांगीण व शास्वत विकास, गतीमान प्रगतीसाठी भाजपाला विजयी करण्याचे आवाहन केले.
‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हा भाजपचा अजेंडा सावंतवाडी नगरपरिषदेत प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच प्रभाग क्रमांक ५ च्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हा नारा दिला. या सकारात्मक उपक्रमाने परिसरातील वातावरण भाजपामय झाले.
