आताच शेअर करा

दिनांक: २७ नोव्हेंबर २०२५

तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे

तळवणे गावातील श्री देवी माऊली ही महाराष्ट्रातील तसेच गोव्यातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेली स्वयंभू माऊली म्हणून प्रसिद्ध आहे.  तळवणे हा एक निसर्गरम्य गाव असून श्री देवी  माऊली मंदिराच्या बाजूला शिव शंकराचा अंश असलेले लिंगाच मंदिर आणि माऊली मंदिराच्या मागच्या बाजूला वाहती नदी हा नजर टिपून घेणारा विलक्षण नजारा पाहून मन भरून येत वार्षिक जात्रोत्सवा दिवशी तर मंदिर व मंदिराच्या आजूबाजूचा परिसर भक्तिमय वातावरणाच्या आसमंतात दरवळून निघतो.

       श्री देवी माऊली ही एक गावातील प्रमुख गावदेवता आहे. जत्रेदिवशी सकाळीच केळी ठेवणे, नवस बोलणे, नवस फेडणे, ओठी भरणे या सारखे कार्यक्रम चालू असतात. या जत्रेला भाविकांची गर्दी उत्तरोत्तर वाढत चालली आहे. रात्री आजगावकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर केला जातो.

     दशक्रोशतील सर्व भाविकांनी जत्रोत्सवास उपस्थित राहून श्री देवी माऊलीच दर्शन घ्यावे व
नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन गावकर मंडळी कडून तसेच गावातील स्थानिक ग्रामस्थानकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed