
दिनांक: २० नोव्हेंबर २०२५
बांदा प्रतिनिधी: बांदा पोलीस ठाणे हद्दीत सापडलेले सुमारे ९० वर्षांचे ज्येष्ठ नागरिक श्रीकृष्ण अनंत काळसेकर यांचे निधन झाले असून त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनाने आवाहन केले आहे.
१३ सप्टेंबर रोजी सदर वयोवृद्ध व्यक्ती बांदा येथे आढळले होते. त्यांनी आपले नाव श्रीकृष्ण अनंत काळसेकर असे सांगितले होते. मात्र त्यांचा पत्ता किंवा कुटुंबीयांची कोणतीही माहिती मिळू शकली नव्हती, त्यामुळे त्यांच्या ओळखीबाबत पडताळणी सुरू होती त्यानंतर त्यांना अनाव येथील आश्रम मध्ये दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, मंगळवारी १८ नोव्हेंबर रोजी त्यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या नातेवाईक अथवा परिचितांपर्यंत पोहचणे अत्यावश्यक झाले आहे. त्यांच्या अंत्यविधीची पुढील कार्यवाही नातेवाईकांशिवाय करणे शक्य नसल्याने पोलीसांनी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
या व्यक्तींना कोण ओळखत असल्यास किंवा त्यांच्या कुटुंबीयां विषयी माहिती असल्यास, कृपया तात्काळ बांदा पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन बांदा पोलीसांनी केले आहे.
