
श्री देव रवळनाथ
दिनांक: २१ नोव्हेंबर २०२५
बांदा प्रतिनिधी: पाडलोस गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ माऊली पंचायतनाचा वार्षिक जत्रौत्सव बुधवार २६ नोव्हेंबर रोजी उत्साहात संपन्न होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तांसाठी दिवसभर विविध धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जत्रोत्सवानिमित्त सकाळी देवतांवर महाआभिषेक, समाराधना, ओटी भरणे, केळी ठेवणे तसेच नवस बोलणे व फेडणे या धार्मिक सेवांचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री १ वा. आजगावकर दशावतार नाट्यमंडळचा महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. सर्व भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन पाडलोस ग्रामस्थांनी केले आहे.
