
दिनांक: २० नोव्हेंबर २०२५
रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत झाडगाव, रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे संशोधन केंद्र प्रमुख डॉ. केतन चौधरी यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुषहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थितांना डॉ. केतन चौधरी यांनी बिरसा मुंडा यांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी यु.एन.डी.पी. प्रकल्पाच्या श्रीम. पियुषा शेलार- देसाई, श्री पंडीत, तसेच पिलेजिक सी-विड रिअर संस्थेचे श्री. निनाद जाधव आणि अविनाश जाधव सुद्धा उपस्थित होते. सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रातील अधिकारी प्रा. नरेंद्र चोगले व सचिन साटम, जीवशास्त्रज्ञ श्रीम. वर्षा सदावर्ते व अपूर्वा सावंत तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
