आताच शेअर करा

दिनांक: ७ नोव्हेंबर २०२५

बांदा प्रतिनिधी: श्री देवी माऊली मंदिर डोंगरापाल येथे श्री देवी माऊली भजन मंडळ यांनी आयोजित केलेली खुली गायन स्पर्धा २०२५ नुकतीच  पार पडली.
२ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या गायन स्पर्धेत मान्यवर प्रमोद कामत , नितीन सावंत, गावचे मानकरी एकनाथ गवस, नामदेव गवस, सहदेव गवस , मुकुंद गवस, सदानंद परब देवस्थान कमिटीचे अध्यक्ष बाबुराव परब , विश्वास च्यारी, निलेश मेस्त्री यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले .

या गायन स्पर्धेत गायकांचा आणि श्रोत्यांचा उत्सपूर्थ प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत अनुक्रमे तीन नंबर काढण्यात आले व दोन उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवण्यात आली होती. प्रथम क्रमांक गीतेश कांबळी (मणेरी)
द्वितीय क्रमांक पारस गवस (डोंगरपाल)
तृतीय क्रमांक सर्वज्ञ वराडकर (डेगवे)
उत्तेजनार्थ पारितोषिक प्रथम क्रमांक सूरज पार्सेकर (न्हावेली) आणि द्वितीय हरीश च्यारी (कुडासे) यांना अनुक्रमे देण्यात आली.
कुमार सर्वज्ञ वराडकर वय वर्ष १० या  बालकाने  सुंदर गायन करून वन्स मोर मिळवला  व श्रोत्यांची  व मान्यवरांची मने जिंकली. या स्पर्धेची सांगता ज्येष्ठ भजनी बुवा जयराम गवस  बुवा यांनी केली.

कार्यक्रमाचे बक्षीस वितरण गावकरी मान्यवर नितीन सावंत , महिला ग्रामपंचायत प्रतिनिधि आरोही गवस , महिला गट प्रमुख जया गवस यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रम नियोजन व सुरक्षित पार पाडण्यासाठी विश्वास गवस, धनंजय गवस, बाबुराव, गवस कुमार, गवस, कृष्णा गवस, राजन गवस, बंटी गवस, अमित गवस, किशोर गवस आणि ग्रामस्थ यांचे  सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed