
दिनांक: ६ नोव्हेंबर २०२५
न्हावेली: न्हावेली टेंबवाडी येथील रहिवाशी शशिकला शशिकांत परब वय ७३ वर्षे यांचे शनिवारी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, पाच मुलगे, सुना , दीर , भावजय, नातवंडे असा परिवार आहे. न्हावेलीचे माजी सरपंच व आयुर्वेद वैद्य शशिकांत परब ऊर्फ दादा वेगुर्लेकर यांची त्या पत्नी तर पत्रकार निलेश परब यांच्या त्या आई होत.
