आताच शेअर करा

दिनांक: ११ नोव्हेंबर २०२५

सावंतवाडी: सिंधुदुर्गाचे हृदय असणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतावर आता सरकारचा लक्ष आपल्या स्वार्थी हेतूसाठी वापर करण्याचा प्रयत्न आज सरकार करत आहे. डोंगर फोडून शक्तिपीठ महामार्ग बनवायची सरकारची धोरणा ही निसर्गाच्या विरोधात काम करत आहे. याचा परिणाम मानवी जीवनासाहित अनेक पशुप्राण्यांना भोगावा लागत आहे. सरकारची धोरणा या  निसर्गाच्या विरोधात जाऊन जनतेला चांगले रस्ते द्यायचे आहेत का ? इको सेन्सिटिव्ह गावांच्या मधून रस्ते काढून निसर्गाशी झुंज देऊन सरकारला मिळवायचे तरी काय?

सुख समृद्ध भरभरून नटलेला कोकण विस्कटून टाकण्याची मन इच्छा सरकारची दिसून येत आहे. कोकण म्हणजे स्वर्ग ,कॅलिफोर्निया असल्याचे भाकित करणारे सरकार आता ते गिळंकृत करायला निघाले आहे. शक्ती पिठाच्या नावाखाली असलेल्या जमिनी आणि तेथील मायानिग विकून कोकणाचा बाजार करायचा ठरवला आहे . विकासाच्या नावाखाली सरकार कोकणातील शेतकऱ्याला भिकारी बनवायचे तक्ते गिरवत आहे. असे तांबोळीतील शेतकऱ्यांनी उद्गार बैठकीत काढले.

  खरं तर कोकणावर कोकणातील स्थानिक शेतकऱ्याचा प्रथम हक्क असून आजपर्यंत जपून ठेवलेली ही संस्कृती, सामाजिक बांधिलकी आणि ऋणानुबंध,  मायभूमी वरती असलेली पकड कुठेतरी खोलून परप्रांतीच्या घशात घालण्याचा मानस सरकारचा दिसत आहे. त्यामुळे सरकारने नवीन आणलेला शक्तिपीठ मार्ग हा या इको सेन्सिटिव्ह झोन मधून हलवावा आणि तो मार्ग वळवून दुसऱ्या दिशेने तुम्हाला जिथे न्यायचा आहे तिथे घेऊन जावा असे शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या सभेमध्ये तांबोळी,असनिये, घारपी झोळंबे, फुकेरी, डेगवे, बांदा, या दिशेने येणारा शक्तीपिठ महामार्गाचा मार्ग बदलून त्याला दुसरी दिशा द्यावी. असे तेथील जनतेने म्हटले आहे.

सह्याद्रीचे डोंगर कात्रून शक्तिपीठ महामार्ग बनवल्यास आज सह्याद्रीच्या डोंगरातून अविरत वाहणारे झरे बंद होतील. तेथील गावांना आज बाराही महिने मिळणारे पाणी आणि  त्यावर फुललेल्या फळबाग  बागायती शेती याला लागणारे पाणी  बंद होईल. भविष्यात ही गावे कोरडी पडतील शेतकऱ्यांनी जर बाग बागायती कोरडी पडली तर करायचे तरी काय? जगावे कसे? या भागातील शेतकरी हा सह्याद्रीच्या कड्या कोपऱ्यात राहून आपली गावे बसून शेती  व्यवसायातून उदरनिर्वाह चालवत आहेत. त्यामुळे सरकारने घेतलेला निर्णय त्रिवार चुकीचा आहे आणि तो बदलावा  असे शेतकऱ्यांनी   आपले म्हणणे बैठकीत मांडले आहे. शक्तिपीठ मार्गाची दिशा न बदलल्यास भविष्यात  शेतककरी एकजूट होऊन येथील सर्व गावांना एकत्रित करून मोठी चळवळ  सरकारच्या विरोधात उभारून लढा देण्याच्या तयारीत आहे.अशी घोषणा सभेत करण्यात आली आहे.

यावेळी शेतकरी प्रथमेश सावंत, प्रकाश सावंत, विश्राम सावंत, तेजस सावंत, भालचंद्र सावंत, सागर सावंत, श्रीराम सावंत, बाळकृष्ण सावंत, आर्यन सावंत, विराज सावंत, शांताराम सावंत, आत्माराम सावंत, नारायण सावंत, मंगेश सावंत, श्यामसुंदर सावंत, कृष्णा सावंत, जगन्नाथ सावंत, दत्तराज सावंत, अशोक सावंत, रुपेश सावंत, उत्तम सावंत, हेमंत सावंत, भास्कर सावंत, अनंत सावंत, मनीष सावंत, प्रवेश सावंत, दत्ताराम सावंत, संदेश सावंत, श्रीकांत सावंत, आशिष सावंत, संतोष सावंत, उमेश सावंत, दत्तप्रसाद सावंत, प्रमोद सावंत, मिलिंद सावंत, महादेव सावंत, आनंद सावंत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed