अयोध्येतील श्री रामललांच्या प्राणप्रतिष्ठापने निमित्त सातार्डा येथील ज्ञानदीप राऊळ व ग्रामस्थ आयोजित गाव मर्यादित भजन स्पर्ध्येत मुंबार्डेवाडी येथील श्री देव बाळवस भजन मंडळाने प्रथम पारितोषिक पटकवाले.
स्पर्ध्येतील द्वितीव पारितोषिक श्री देव ईश्वटी भजन मंडळ,केरकरवाडी, तृतीय पारितोषिक श्री देव रवळनाथ भजन मंडळ,सातार्डा व चौथे पारितोषिक बांदवाडी भजन मंडळाला देऊन सिंधुदुर्ग येथील श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री पिळणकर पुरस्कृत रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
स्पर्ध्येतील उत्कृष्ट गायक म्हणून कृष्णा मयेकर,श्री देव बाळवस,मुंबार्डेवाडी व दादा शिरोडकर,श्री देव इस्वटी भजन मंडळ,केरकरवाडी यांना रोख पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रकाश नाईक,दीपक मेस्त्री, सत्यनारायण कलंगुटकर,शंकर पटेकर यांनी काम पाहिले.
स्पर्धेचे सूत्रसंचालन बंड्या काळे व श्रीराम प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष संजय पिळणकर यांनी केले.यावेळी स्पर्धेला सातार्डा पंचक्रोशीतील रामभक्त व संगीतप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.