आताच शेअर करा

दिनांक: ४ नोव्हेंबर २०२५

बांदा प्रतिनिधी: डोंगरापाल येथे बिबट्याने  धुमाकूळ घातला असून मध्य रात्री मिलिंद परब यांच्या फॉर्म हाऊस मध्ये प्रतिवर्षी प्रमाणे या ही वर्षी बिबट्या वावरताना दिसला.काल रात्री  सदर व्यक्तीच्या फॉर्म हाऊस मध्ये मध्य रात्रीच्या सुमारास आपली गस्त घालत असताना बिबट्या दिसून आला. मिलिंद हे परदेशात आपल्या नोकरी निमित्त असतात. परंतु त्यांना शेतीची आवड असल्याने  त्यांनी आपल्या बागेत दोन कामगार काम  करण्यासाठी ठेवले  आहेत. त्या कामगारांना रहाण्यासाठी घर बांधून दिले तिथेच हा बिबट्या फिरत असताना कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

गेल्या वर्षी वनविभागाच्या निदर्शनास ही  बाब आणून दिली होती.परंतु वनविभागाने कोणतीही  कारवाई केली  नाही. मिलिंद परदेशातून  असूनही आपली बागायती शेती सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु वास्तव्यास असलेल्या कामगाराच्या राहत्या घरी हा बिबट्या रात्रीच्या वेळी बिनधास्त फिरताना दिसला.

अजूनही वनविभागाला जाग येत नाही का? की जीवित हानी झाल्यावर वनविभाग लक्ष वेधणार आहे का? असा सवाल मिलिंद  करत आहेत. सापळा लाऊन  बिबट्याला जेल बंद का करत नाही? असे अनेक प्रश्न आज ठाण मांडून  माझ्या मनात उभे आहेत. रात्री अपरात्री अघटीत घटना घडल्यास जबाबदार कोण? असाही मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहे.रात्रीच्या वेळी माझ्या कामगारांचा जीव धोक्यात आहे. असे मला वाटते. जरी वनविभाग प्रशासन डोळे झाक करत असले तरी आज  रानटी प्राणी  माझ्या बागेत थैमान घालत आहे. हा  बिबट्या भक्ष्याच्या शोधत गावामध्ये ही घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा लवकरात लवकर हा बिबट्या जेलबंद करावा अशी मागणी आज माझ्या व गावातील नागरिकांच्या वतीने वनविभाग प्रशासनाला करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed