
दिनांक: ३१ ऑक्टोबर २०२५
सावंतवाडी: संदिप चौकेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून “प्राणजीवन सहयोग संस्था, शिरवल” यांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमांसह बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
“प्राणजीवन सहयोग संस्था, शिरवल” यांच्या वतीने संस्थाध्यक्ष श्री. संदिप रघुनाथ चौकेकर (समाजभूषण पुरस्कार प्राप्त) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आणि विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
संपूर्ण दिवस चाललेल्या या सामाजिक उपक्रमांत — मोफत आरोग्य शिबिर (ग्रामपंचायत हळवल), रुग्णांना फळवाटप (उपजिल्हा रुग्णालय, कणकवली), गोचारा प्रदान (गोवर्धन गोशाळा, करंजे), स्नेहभोजन व भेटवस्तू वाटप (सविता वृद्धाश्रम, पणदूर), तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप (दयासागर छात्रालय, रोणापाल) या उपक्रमांचा समावेश होता.
दिवसअखेर कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडी येथे रंगलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेने या विशेष दिनाचा उत्साह द्विगुणित केला.
🏆 स्पर्धेचा निकाल जाहीर
🔹 खुला गट:
१️⃣ सुश्रुत मंदार नानल — पहिले बक्षीस
२️⃣ बाळकृष्ण पेडणेकर — दुसरे बक्षीस
३️⃣ संदिप धुरी — तिसरे बक्षीस
४️⃣ सोहम देशमुख — चौथे बक्षीस
५️⃣ लिलाधर वराडकर — पाचवे बक्षीस
६️⃣ अक्षय देवलकर — सहावे बक्षीस
७️⃣ जुई राजेंद्र उबाळे — सातवे बक्षीस
८️⃣ मयूरेश परुळेकर — आठवे बक्षीस
९️⃣ मिनल सुलेभवी — नववे बक्षीस
🔟 संतोष गंगनाइक — दहावे बक्षीस
🔹 जेष्ठ खेळाडू गट:
१️⃣ भिसाजी तानावडे — पहिले बक्षीस
२️⃣ बळीराम आडेलकर — दुसरे बक्षीस
३️⃣ निळकंठ मणेरीकर — तिसरे बक्षीस
🔹 १६ वर्षाखालील गट:
१️⃣ यथार्थ मंगेश डांगी — पहिले बक्षीस
२️⃣ प्रतीक देसाई — दुसरे बक्षीस
३️⃣ रुद्रा मोबारकर — तिसरे बक्षीस
४️⃣ वशांत गवस — चौथे बक्षीस
५️⃣ अथर्व वेंगुर्लेकर — पाचवे बक्षीस
६️⃣ पार्थ वझे — सहावे बक्षीस
७️⃣ चिदानंद रेडकर — सातवे बक्षीस
८️⃣ वैभव राऊळ — आठवे बक्षीस
९️⃣ अन्वय सापळे — नववे बक्षीस
🔟 दुर्वांक मलबारी — दहावे बक्षीस
🔹 महिला गट:
१️⃣ गार्गी किरण सावंत — पहिले बक्षीस
२️⃣ भूमी कामत — दुसरे बक्षीस
३️⃣ तनिष्का आडेलकर — तिसरे बक्षीस
🔹 सावंतवाडी उत्कृष्ट खेळाडू:
१️⃣ विराज दळवी — पहिले बक्षीस
२️⃣ हर्ष राऊळ — दुसरे बक्षीस
३️⃣ पार्थ गावकर — तिसरे बक्षीस
🎖️ कार्यक्रमातील मान्यवर उपस्थिती
🏁 उद्घाटन प्रसंगी मान्यवर:
शेखर जैन, चेअरमन, संस्कार नॅशनल स्कूल
शैलेश पई, संचालक, कळसुलकर स्कूल
🏅 बक्षीस वितरण प्रसंगी मान्यवर:
संदिप चौकेकर, अध्यक्ष, प्राणजीवन सहयोग संस्था
केंकरे, कर्मचारी, कळसुलकर स्कूल
बाबली कृष्णा गावडे, ऑन-कॉल रक्तदाते
भिसाजी तानावडे, जेष्ठ खेळाडू
चंद्रकांत रणशूर, जेष्ठ खेळाडू
संदिप धुरी, विशेष सहकार्य
आडेलकर, जेष्ठ खेळाडू
शशिकांत साळगावकर, जेष्ठ नागरिक
मनिष मारुलकर, पंच (Chess Arbiter), कोल्हापूर
राजेंद्र तवटे, परीक्षक
सुयोग धामापुरकर, परीक्षक
कौस्तुभ पेडणेकर, मुक्ताई चेस अकॅडमी
स्वप्नील पुजारे, संस्था उपाध्यक्ष
प्रशांत गावडे, संस्था प्रतिनिधी
सिद्धेश परब, संस्था प्रतिनिधी
मिथुन लाड, संस्था प्रतिनिधी
श्रीकृष्ण यादव, संस्था प्रतिनिधी
गितेश शेणई, आयोजक व डिजिटल दुकान संचालक
श्रीकांत तानावडे, आयोजक व डिजिटल दुकान संचालक
♟️ स्पर्धेचे वैशिष्ट्य
स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधून आणि संस्थांमधून तब्बल शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
संपूर्ण स्पर्धा मनिष मारुलकर (कोल्हापूर) यांच्या पंचपदी मार्गदर्शनाखाली स्विस लीग अंतर्गत यशस्वीरीत्या पार पडली. तसेच या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूं सुद्धा सहभागी झाले होते.
प्रत्येक गटातील विजेत्यांना प्रमाणपत्रे, ट्रॉफी आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
💬 संदिप चौकेकर यांचे मनोगत
संस्थाध्यक्ष श्री. संदिप चौकेकर यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले —
“बुद्धिबळ हा खेळ केवळ मोहर्यांचा नाही, तर संयम, विचारशक्ती आणि निर्णयक्षमता विकसित करणारा जीवनाचा धडा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांमध्ये या खेळाबद्दलची आवड वाढावी, हा या स्पर्धेचा उद्देश आहे.”
त्याचबरोबर त्यांनी दिवसभर चाललेल्या आरोग्य, गोसेवा, वृद्धसेवा आणि शिक्षणविषयक उपक्रमांना उपस्थित नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
🌿 समारोप
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गौरवी घाटे आणि आयोजन गितेश शेणई व श्रीकांत तानावडे यांनी उत्कृष्टपणे पार पाडले.
स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सर्व परीक्षक, पंच, सहकारी व संस्थेच्या सदस्यांचा श्री. चौकेकर यांनी आभार मानले.
🗞️ या स्पर्धेद्वारे जिल्ह्यातील बुद्धिबळ खेळाडूंना प्रोत्साहन मिळून, पुढील काळात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये अग्रस्थानी राहील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
