आताच शेअर करा

दिनांक: ३१ ऑक्टोबर २०२५

शिरोडा प्रतिनिधी: सावंतवाडी वेंगुर्ले विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री दीपक भाई केसरकर यांनी आज रोजी शिरोडा, गांधीनगर येथील नियोजित सत्याग्रह स्मारकाच्या ठिकाणी भेट दिली. जिल्हाधिकारी यांच्याशी पाठपुरावा करून स्मारकासाठीच्या जमिन हस्तांतरणाविषयीचे प्रकरण आपण लवकरच मार्गी लावू, असे आश्वासन येथील ग्रामस्थ व उपस्थित आंदोलनकर्त्यांना दिले. स्मारक उभारण्यापूर्वी या भागातील रस्ता करण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही आ. केसरकर यांनी सांगितले. यावेळी वेंगुर्ले तालुक्याचे तहसीलदार श्री. ओंकार ओतारी, शिरोडा गावचे सरपंच सौ. लतिका रेडकर, उपसरपंच श्री. चंदन हाडकी,सदस्य श्री. मयुरेश शिरोडकर शिवसेनेचे जिल्हा समन्वयक श्री. सचिन वालावलकर तसेच श्री. नितीन मांजरेकर, काशिनाथ नार्वेकर, कौशिक परब, सिद्धेश परब, दत्तगुरु परब, पांडुरंग नाईक, अमित गावडे, दिलीप मठकर , सौ. शीतल साळगावकर, सौ. हर्षा परब हे उपस्थित होते.
  
    आंदोलन कर्ते घ्या वतीने श्री. दिलीप गावडे, श्री. संदीप गावडे, सुनील गावडे, गोपी राऊत, विशाल गावडे, दिंगबर परब, सौ. दिपाली राऊत, देवेश गावडे, तुषार राऊत , प्रवीण धानजी, राकेश परब, आनंद मसुरकर, उदय गावडे आदि उपस्थित होते.
  येथील ग्रामस्थांच्या वतीने गांधीनगर येथील विविध विकासकामांविषयी निवेदने आमदार श्री दीपक केसरकर यांना देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed