आताच शेअर करा

दिनांक: ३१ ऑक्टोबर २०२५

बांदा: श्री देवी माऊली भजन मंडळ डोंगरपाल यांच्या वतीने रविवार दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी खुली अभंग गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या २५  गायकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ अशी पारितोषिक देण्यात  येतील.प्रथम पारितोषिक ३,३३३, तृतीय पारितोषिक २,२२२, तृतीय पारितोषिक १,१११, उत्तेजनार्थ २ बक्षीस रोख ५०० रुपये ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत अभंगाचा कालावधी ४ ते ६ मिनिटांचा असून स्पर्धकांना संगीत सात पुरवली जाईल. प्रत्येकी १०० रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून गुरुवर्य  विश्वास च्यारी, हे काम बघतील.हार्मोनियम: निलेश मेस्त्री, तबला विठ्ठल च्यारी हे काम पाहातील. संध्याकाळी ६:३० वाजता मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल.७:००  वाजता स्पर्धेला प्रारंभ होईल. रात्री ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात येईल. इच्छुक कलाकारांनी आपले नाव नोंदणी साठी संपर्क क्रमांक श्री.कुमार गवस ७५८८४४७४४० विश्वनाथ गवस ९४०३३०७१४९४ श्रीकांत गवस ९४२०३१७२८२ या संधीचा फायदा घेऊन आपली गायन कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करावी असे आव्हान श्री देवी माऊली भजन मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed