
दोडामार्ग: प्रतिनिधि
दिनांक: २१ सप्टेंबर २०२५
दोडामार्ग तालुक्यातील वझरे येथील नारायण उर्फ संतोष आत्माराम सिद्धये यांनी यावर्षी आपल्या बागेत ऑर्गानिक पद्धतीने गाईच्या ताकापासून खत बनवून त्यावर दोडका यावेल वर्गी भाजीचं उत्पन्न घेऊन तब्बल ३१ इंच लांबीचं आणि १ किलो २०० ग्राम वजनी दोडक्याची फळ घेतले.
सिद्धये हे एक शेतकरी असून ते ऑरगॅनिक पद्धतीने आपल्या शेतात नवीन नवीन उपक्रम राबवत असतात. त्यांनी यावर्षी दोडका या वेलवर्गी फळावर आपल्या संशोधनाच्या माध्यमातून एक खत तयार करून त्यावर प्रकिया करून फळाला वाढवले व ते फळ परिपक्व झाल्यानंतर त्याचे वजन आणि उंची मोजून दाखवली.
ऑरगॅनिक पद्धतीने खत निर्माण करून शेतीत पूरक पद्धतीने त्याचा वापर केल्यास ऑरगॅनिक शेतीतून चांगले पीक घेता येते असे ते म्हणाले. हा उपक्रम फक्त स्वतःसाठी जपून न ठेवता तो सिंधुदुर्गातील सर्व शेतकऱ्यांनी आचरणात आणला पाहिजे यासाठी ते आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत असतात. शेतकरी जगला पाहिजे तरच तो देशाला जगवू शकतो.आज कुठेतरी शेती ही कमजोर समजून आजची युवापुढे शेतीकडे दुर्लक्ष करून शहराकडे नोकरी धंद्यासाठी पळत आहेत. त्यामुळे ऑरगॅनिक आणि पारंपरिक पद्धतीने शेती करणारा शेतकरी हा आज राहिला नाही. शेतीत काही राम नाही असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा ऑरगॅनिक पद्धतीने वेगवेगळे प्रयोग करून शेती करून पहावी. नक्कीच त्यामध्ये तुम्हाला यश येईल. कोकणात आज शेतकरी विरळ झाल्याने भविष्यात देशावर मोठे संकट येण्याची शक्यता आहे. हे आज आपल्या समोर दिसत आहे. भविष्यात शेतीमुळे देशाची आर्थिक स्थिती कोलमडू शकते. त्यामुळे घरामध्ये एखादा तरी मुलगा शेतीकडे वळून शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून शेती करावी. त्यामुळे देशावर भविष्यात येणारे संकट कुठेतरी दूर करता येईल. फास्टफूड आणि कीटकनाशके फवारणी केलेले अन्नधान्य आज आपण खात आहोत .प्रत्येकाच्या घरात डायबिटीस, ब्लडप्रेशर असे आजार निर्माण झाले आहेत प्रत्येक घरामध्ये एक किंवा दोन आज या रोगाने त्रस्त रुग्ण सापडत आहेत. याचा एकमेव कारण म्हणजे आपण ऑरगॅनिक शेतीकडे दुर्लक्ष करून रासायनिक शेतीकडे वळलो. त्यामुळे सर्व रोग आपल्या पदरात पाडून घेतले आहेत. या रोगांपासून दूर राहावयाचे असल्यास ऑरगॅनिक शेती शिवाय भविष्यात पर्याय नाही. असे ते म्हणाले.
