आताच शेअर करा
फोटो: सरपंच सौ. लतिका रेडकर यांना निवेदन देताना सर्वश्री. सुनील गावडे, संदीप गावडे, देवेश गावडे, दिगंबर परब, नारायण (बाबी) गावडे सत्याग्रह स्मारकाची जागा आणि देण्यात आलेले निवेदन.

दिनांक: २१ सप्टेंबर २०२५

वेगुर्ला प्रतिनिधि: सन २०२२ मधे खूप मोठा गाजावाजा करत शिरोडा येथील मिठ सत्याग्रहाचा ठिकाणी देशाच्या स्वातंत्र्याची पंचाहत्तरीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सत्याग्रह स्मारक लवकरच मार्गी लागेल यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन माध्यमांसमोर ग्रामस्थांना दिले. पण दुर्दैवाने त्या दिवसापासून स्मारकाची फाईल धुळ खात पडली आहे.
शासनाला तसेच स्मारकासंदर्भात आश्वासन देणार्यां जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीना स्मारक उभारणीचा पूर्णपणे विसर पडला आहे. या सर्व संबंधितांना जाग यावी व त्यांनी स्मारकाचे जमिन हस्तांतरणाचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत याकरिता शिरोडा पंचक्रोशीतील जागरूक नागरिकांच्या वतीने गांधी जयंती दिनी २ आक्टोबर २०२५ रोजी सत्याग्रह स्मारकाच्या नियोजित ठिकाणी एकदिवसीय उपोषण करण्यात येणार आहे.

यासंबंधीचीचे निवेदन मा. जिल्हाधिकारी, मा. तहसीलदार, मा. पोलिस ठाण्यात व शिरोडा गावचे सरपंच यांना देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed