आताच शेअर करा

दिनांक: ०९/०८/२०२६

बांदा: घरगूती एलपीजी गॅँस सिलिंडर बुकिंगसाठी लागू असलेली ४५ दिवसांची कालमर्यादा तातडीने कमी
करून नागरिकांना दिलासा देण्याबाबतचे निवेदन नुकतेच भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जावेद खतिब यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.
      सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने आपणास हे निवेदन सादर करीत आहोत. सध्या
घरगुती एलपीजी गॅँस सिलिंडर बुकींगसाठी लागू असलेली ४५ दिवसांची कालमर्यादा ही नागरिकांसाठी अत्यंत
त्रासदायक व गैरसोयीची ठरत आहे.विशेषतः सणासूदीच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचा मोठा परिणाम ग्रामीण
तसेच शहरी भागातील सर्वसामान्य कुटुंबावर होत असून तातडीने यामध्ये शिथिलता आणण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
     सध्या पवित्र श्रावण महिना सुरू होणार असून त्यानंतर काही दिवसांतच श्री गणेश चत्तुर्थी हा महाराष्ट्रातील
सर्वात मोठा आणि भावनिक दुष्ट्या महत्वाचा सण साजरा होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवाला विशेष
धार्मिक,सांस्कृतिक व पारंपरिक महत्व आहे.या कालावधीत प्रत्येक घरामध्ये मोठ्या प्रमाणात स्वयंपाक केला जातो,नैवेद्य,फराळ, विविध पारंपरिक पदार्थ,पाहुणचार आणि धार्मिक विधी यासाठी गॅस सिलिंडरचा वापर
लक्षणीयरीत्या वाढतो.अशा परिस्थितीत ४५ दिवसांची बुकींग मर्यादा नागरिकांसाठी मोठी अडचण निर्माण करीत
आहे.सध्या अनेक ग्राहकांना एकदा सिलिंडर मिळाल्यानंतर पुढील बूकिंगसाठी ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागत
असल्याने वेळेवर गॅस उपलब्ध होत नाही.अनेक कुटुंबांमध्ये एकच गॅस सिलिंडर असल्यामुळे सिलिंडर
संपल्यानंतर स्वयंपाक करणे कठीण होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed