
दिनांक: ०९/०८/२०२६
बांदा: शनिवार दिनांक १ ऑगस्ट रोजी दुर्गवाड – कुडाळ येथे झालेल्या टेनिस क्रिकेट वेलफेअर असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग संलग्न टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या तर्फे टेनिस बॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत १७ वर्षाखालील मुले या गटासाठी झालेल्या निवड चाचणीत व्ही एन नाबर प्रशालेचा विद्यार्थी कु. रुद्र नारायण मोरजकर याची निवड २०/०८/२०२६ ते २३/०८/२०२६ या कालावधीत अहिल्यानगर येथे होणार्या राज्यस्तरीय टेनिस बॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्याचे हे यश शाळेसाठी कौतुकाची बाब आहे. त्याच्या यशाबद्दल शाळेचे चेअरमन श्री. मंगेश कामत, गव्हर्निंग कौन्सीलचे सर्व सदस्य, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष श्री. सुनील दिवाकर नाटेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. मनाली देसाई तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले त्याचप्रमाणे त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री. प्रशांत देसाई यांचेही अभिनंदन केले आहे
