
दिनांक: ४ सप्टेंबर २०२५
बांदा प्रतिनिधी :कोणशी येथे ईशा बाळकृष्ण केसरकर वय २२ राहणार भटवाडी हिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
सविस्तर बातमी अशी की ईशा ही पर्वाच्या दिवशी संध्याकाळी ७: ३० वाजता खोलीत गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगी उठली नाही म्हणून उठवायला गेले तर दरवाज्याची कडी लावलेली होती खोलीतून काहीच हालचाल होईना म्हणून दरवाजा तोडण्यात आला त्यावेळी ईशा हि खोलीतील लोखंडी बाराला नायलॉन च्या साडीने घालफस घेऊन लटकताना निदर्शनास आली. बांदा पोलिस स्टेशनला ही बातमी कळताच घटनास्थळी API पालवे PSI झाझुर्डे ASI कोळेकर हेडकॉन्स्टेबल रामचंद्र तेली, महिला पोलिस निकिता आळवे, दाखल झाले. काल संध्याकाळी पोस्टमार्टम करण्यात आला. पुढील तपास बांदा पोलिस ठाणे करत आहेत.