
दिनांक: ५ सप्टेंबर २०२५
तळवणे प्रतिनिधि: शंकर गावडे
दरवर्षी शासनाच्या वतीने घेण्यात येणारे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले असून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद च्या शिक्षकांनी आपल्या कामाची चोख पावती शासनासमोर ठेवली आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर उत्कृष्ट शिक्षक ही पदवी मिळवली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुक्यातून उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी एकूण 21 प्रस्ताव आले होते. आलेल्या प्रस्ताव अंतर्गत दोन टप्प्यात काटेकोरपणे मुलाखती घेऊन शिक्षकांमध्ये असलेली गुणवत्ता त्यांच्याकडे असलेल्या कर्तृत्व तसेच शैक्षणिक पात्रता अशा विविध बाबींचा विचार करून विभागीय कोकण आयुक्तांकडून पूर्णपणे मंजुरी मिळाल्यानंतर जे शिक्षक या पुरस्कारासाठी पात्र होते त्यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार घोषित करण्यात आला.
ज्या शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. त्या आठ शिक्षकांना खास कार्यक्रम आयोजित करून हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
वेंगुर्ला : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मठ कणकेवाडी क्र. 3 चे उपशिक्षक रामा वासुदेव पोळजी.
सावंतवाडी: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा माडखोल क्र.1 चे पदवीधर शिक्षक विलास रामचंद्र फाले.
कणकवली : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्र. 1 पदवीधर शिक्षक विनायक शंकर जाधव.
दोडामार्ग : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळये उपशिक्षक उदय विठ्ठल गवस.
कुडाळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, माणगाव येथील उपशिक्षक बाबाजी सुरेश भोई.
देवगड : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिर्ये क्र. 1 चे उपशिक्षक संजय शामराव पाटील.
वैभववाडी : पीएम दत्त विद्या मंदिर, वैभववाडी येथील उपशिक्षक दिनकर शंकर केळकर.
मालवण : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेरी मळाचे उपशिक्षक चंद्रकांत गणपत कदम.