आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर

दिनांक:  ७ जुलै २०२५

पवनार ते पत्रादेवी (गोवा ) शक्तिपीठ महामार्ग सिंधुदुर्गच्या टोकाला बांदा येथे जोडला जाणार होता. त्या महामार्गाचा जिल्ह्याला कोणताच फायदा होणार नव्हता.येथील बाजारपेठ, पर्यटन व जनजीवन विस्कळीत करणारा हा महामार्ग ठरणार होता. अलीकडेच पालकमंत्री नितेश राणे यांनी शक्तिपीठ महामार्ग गोव्याकडे न जाता तो मळगाव किंवा झाराप येथे जोडण्यात यावा अशी भुमिका घेतली स्पष्ट केली आहे. त्यांनी आता असलेला प्लॅन बदलणारच असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेली भुमिका जिल्ह्याच्या विकासासाठी फलदायी ठरणार असुन त्यांच्या  भूमिकचे आम्ही समर्थन करतो असे स्पष्टीकरण माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रमोद कामत यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून दिले.
   बांदा मंडल भारतीय जनता पार्टी, महामार्ग विरोधी शेतकरी कृती समिती व शेतकरी यांच्या वतीने ही पत्रकारपरिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री कामत बोलतं होते. यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक,
माजी अध्यक्ष महेश धुरी, सरचिटणीस मधुकर देसाई, जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब,उमेश पेडणेकर,  , नेतार्डे उपसरपंच प्रशांत कामत, राजेश विरनोडकर, माजी उपसरपंच बाळू सावंत, ज्ञानेश्वर सावंत, उमेश पेडणेकर, उपसरपंच आबा धारगळकर, माजी सरपंच बाळा आकेरकर  आदी उपस्थित होते.
   यावेळी बोलताना प्रमोद कामत पुढे म्हणाले, पवनार ते गोवा असा जाणारा महामार्ग सिंधुदुर्गचे शेवटचे टोक असणाऱ्या बांदा सीमेलगत बाहेर पडणार होता. दरम्यान या महामार्गामुळे येथील गावातील जनजीवन विस्कळीत होणार होते. बाजारपेठा उध्वस्त होणार होत्या. याबाबत आम्ही बांदा ग्रामस्थ, पदाधिकारी व शेतकरी यांनी खासदार नारायण राणे यांची भेट घेतली होती. याबाबत पालकमंत्री नितेश राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांची सुद्धा भेट घेतली होती. बारा गावे बाधित होणार तसेच होणाऱ्या नुकसानि बाबत व्यथा मांडली होती.  दरम्यान खासदार नारायण राणे यांनी  त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात  संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या जिल्ह्याच्या विकासाला या महामार्गाचा विकास होईल असे एबीसी तिन प्लॅन तयार करण्याचे  आदेश दिले होते. त्यानुसार आता तीन प्लॅन तयार असुन त्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी सदर महामार्ग झाराप किंवा मळगाव येथे जोडवा अशी भूमिका  मांडत सदरचा जुना प्लॅन बदलणारच असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आम्ही पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या भूमिकेचे समर्थन करत असुन त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
  यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी सुद्धा आभार व्यक्त केले. यावेळी वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, नितीन राऊळ, इन्सुली सोसायटीचे चेअरमन दादा परब,माजी सरपंच दीपक सावंत, गुरु सावंत, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, साई पावसकर, संदीप बांदेकर,  गुरु कल्याणकर, वाफोली उपसरपंच विनेश गवस, राजा सावंत, गजानन गायतोंडे, शांताराम बंदिवाडेकर, नितीन सावंत, राजा सावंत, भाऊ वाळके, मयुर परब, निलेश कदम आदी सह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed