आताच शेअर करा

दिनांक: ७ जुलै २०२

न्हावेली / वार्ताहर
   सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड कोंडुरे देऊळवाडी येथील प्रभाकर मुळीक या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला चढवत गंभीर जखमी केले.मिळालेल्या माहिती अशी की,मांजराला आपला भक्ष करण्यासाठी बिबट्या आला होता.मुळीक यांना घराच्या मागच्या बाजूला कोणीतरी आल्याची चाहूल लागल्याने त्यांनी दरवाजा उघडून मुळीक गेले असता त्यांच्यासमोरच बिबट्या असल्याने ते भयभीत झाले.मात्र बिबट्याने लगेचच मुळीक यांच्यावर हल्ला चढवत डोक्यावर पंजा मारत त्यांना गंभीर जखमी केले.यावेळी मुळीक यांनी आरडाओरडा करतात बिबट्याने पलायन केले.यानंतर जखमी मुळीक यांना उपचारासाठी मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले.ही घटना घडली असताना लगेचच अर्ध्या तासाच्या अंतरात देऊळवाडी येथील सावंत यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवत त्यांना ओढून नेण्याचा प्रयत्न केला.मात्र ग्रामस्थांनी प्रयत्न करून त्यांना बिबट्याच्या तावडीतून सोडवले असता त्या ग्रामस्थांमधील पंढरी आजगावकर यांच्यावर बिबट्याने हल्ला करत त्यांना जखमी केले.या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे.
   दिवसाढवळ्या भरवस्तीत देऊन बिबट्याने हल्ला केल्याने या परिसरात भीतीचे वातावरण आहे.मुळीक यांच्या घरामागील बागेत चारही बाजूला पावसाचे पाणी साचले असल्याने बिबट्या पाण्यातून बागेबाहेर जाणं कठीण असल्याने सदरच्या बिबट्या हा बागेतच असावा असा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी वर्तवला आहे.यामुळे वनविभागाने सदरच्या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed