आताच शेअर करा

दिनांक:  ६ जुलै २०२५

बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर

बांदा शहरातील विद्युत विषयक समस्या वेळ काळ न पाहता सोडविणारे त्याचप्रमाणे प्रामाणिक आणि निस्वार्थी भावनेने जनसेवा करणारे MSEB चे वायरमन श्री अमित वाघाटे यांची बढती लाईनमन म्हणून कणकवली येथे झाली आहे. त्यांच्या प्रामाणिक कार्याबद्दल भारतीय जनता पार्टी बांदा शहर तर्फे त्यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री दादू कविटकर, भाजपा शहर अध्यक्ष श्री बाबा काणेकर, बांदा उपसरपंच श्री राजाराम धारगळकर, भाजपा शहर उपाध्यक्ष शैलेश केसरकर, ग्रामपंचायत सदस्य श्री रत्नाकर आगलावे त्याचप्रमाणे भाजपचे सिद्धेशजी महाजन, बंड्या गिरप, संदीप बांदेकर आणि बुध अध्यक्ष संदेश सातार्डेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed