आताच शेअर करा

दिनांक: १७ मे २०२५

तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे

बी.एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट आणि श्री देव पाटेकर पंचायतन, तिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय सुलेखन कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दि.१२ ते १६ मे 2025 रोजी या कालावधीत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तिरोडा नं. 1  येथे सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत ही कार्यशाळा पार पडली यात 55 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

       या कार्यशाळेत सुप्रसिद्ध सुलेखनकार आणि बी. एस. बांदेकर महाविद्यालयाचे प्रादेश निरूरकर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. त्यांनी विद्यार्थ्यांना अक्षरांची आकर्षक रचना तसेच सौंदर्यशास्त्र याबद्दल विशेष मार्गदर्शन केले. तसेच पहलगाम येथील हल्ल्यात मृत पावलेल्या आणि देशासाठी शहीद झालेल्या वीर भारतीय जवानांना आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. त्यानंतर सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली.

  यावेळी बी. एस. बांदेकर कॉलेजचे प्राचार्य उदय वेले, शाळा तिरोडा नंबर 1 चे  मुख्याध्यापक, शिक्षक व शालेय समिती सदस्य तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे पालक गावचे सरपंच,  उपसरपंच व पोलीस पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *