
दिनांक: १७ मे २०२५
बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर
बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांनी आपल्या अथक प्रयत्नानंतर बांदा वासी यांचे स्वप्न पूर्ण केले. महामार्गावरील गेली दीड वर्षानंतर उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन अवघ्या काही दिवसातच त्याचे दिग्गज नेत्यांकडून लोकार्पण सोहळा पार पडण्यात आला. त्यावेळी श्री आईर यांनी आपण केलेल्या प्रयत्नांचे चीज झाल्याचे सांगून हे काम पूर्ण झाल्यानंतर व उद्घाटनानंतर आपण ह्या उड्डाण पुलासाठी कशापद्धतीने मेहनत घेतली ती आपल्या मनोगतात व्यक्त केले.
मनोगत: बांदा उड्डाण पुलाच्या उद्घाटनानंतर केले वक्तव्य..
बांदा दशक्रोशीतीन लोकांनी मला भरभरून प्रेम दिले, पाठिंबा दिला त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे डोंगरा एवढ आव्हान स्वीकारून बांदा वासियांचे स्वप्न सत्यात उतरवून दाखविले..! बांदा दशक्रोशिथिल तमाम लोकांचे प्रेम, मार्गदर्शन, पाठिंबा हाच माझा सत्कार आहे,
अनेक लोकांनी fb वर पोस्ट टाकून आव्हान केले होते की संजय आईर बांदा उड्डाण पूल करायला तुला सतरा जल्म घ्यावे लागतील…? तर दुसरा जबाबदार व्यक्ती सांगत होता की मी ५००/रु बाँड वर लिहून देतो बांदा उड्डाण पूल होणारं नाही..? तिसरा सांगत होता.. कोण सांगतो उड्डाण पूल होणारं…? कस होत ते मी बघतो…? चौथ्या व्यक्तीने आपल्या गावातील महिला सरपंच मॅडम यांनी आपल्या सही शिक्याने बांदा उड्डाण पुलासाठी तयार केलेला ठराव त्यांच्या हातातून काढून घेतला व फाडला…!! अशीच लोकं उद्घाटनाच्या अग्रस्थानी होती पण मी त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो त्यांच्या नाकारात्मक विचारांनी.. वक्तव्यांनी त्यांनी केलेले आव्हान स्वीकारण्यास आम्हाला बळ मिळाले…? आणि हे काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आम्ही जीव ओतून कामाला लागलो…!?
नेते, पुढारी, मंत्री संत्री यांनी जाणीव पूर्वक उद्घाटन सोहळ्या पासून मला दूर ठेवून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही म्हणजे माझ्या हितचिंतकानी मला स्वीकारून भरभरून प्रेम दिलात याने मी भारावून गेलो आहे..? तुमच प्रेम आणि ऋण मी कधी विसरणार नाही..? अखेरच्या श्वासा पर्यन्त ते मी माझ्या अंतःकरणी फीड करून ठेवले आहेत,
बांदा उड्डाण पुलाच्या उद्घाटन प्रसंगी मला दूर ठेवण्यात आले ही बाब माझ्या साठी दुःखदाई आहे मात्र तुम्ही दिलेल्या प्रेमाने, पाठिब्याने माझी जखम भरून निघाली आहे, मी व माझ्या सहकाऱ्यांनी उद्घाटन सोहळा गांभिर्याने घेतलेला नाही…! तुमच्या पाठिंबा, व प्रेम तुमचे मार्मिक अभिप्राय यामुळे झालेला कार्यक्रम फ्लॉप शो ठरला हे काल पासून मला भरभरून आलेले प्रेमाचे msg व फोन यावरून सिद्ध झाले आहे, बांदा उड्डाण पुलावरून माझे नाव फुसून टाकणाऱ्या सतरा जल्म घ्यावे लागतील असे काल पासून मला वैयक्तिक आलेले फोन व मेसेज यावरून दिसून आले.. हीच आमची ताकद आहे…?
बांदा उड्डाण पुलाचा प्रस्ताव बजेट मधून कित्येक वेळा बाहेर टाकण्यात आला, दिल्ली मध्ये बांदा उड्डाण पूल होऊ नये म्हणून आपली उरली सुरली ताकद लावून बसले होते…? बांदा वासियांच्या प्रबळ इच्छा शक्ती समोर त्यांचा विरोध हवेत विरघळून गेला..? ही बांदेश्वर भूमी आहे, ही पाटेश्वराची भूमी आहे येथे सत्याला न्याय मिळतो,
बांदेश्वराच्या भूमीत खालच्या पातळीच्या राजनीतीला व खोटारडेपणाला वाव नाही…?
खरं तर बांदा उड्डाण फुलाचा कार्यक्रम हा राष्ट्रीय महामार्ग विभागाने आयोजित केलेला कार्यक्रम न होता. राष्ट्रीय महामार्ग विभाग वरिष्ठ पातळीवर परवानगी घेऊ कार्यक्रम पत्रिका छापून प्रोटोकॉल नुसार लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करते. राष्ट्रीय महामार्ग विभागाने फोन करून दिलगिरी व्यक्त केली या कार्यक्रमाचे आयोजन आपण केले नसून आम्ही आयोजन केले असते तर तुम्हाला अग्रस्थानी निमंत्रित केले असते. तुमच्या अफाट कष्टाने व प्रयत्नाने बांदा उड्डाण पुलाचे स्वप्न पूर्ण झाले त्याबद्दल राष्ट्रीय महामार्ग विभागाने फोन करून कौतुक व अभिनंदन केले.
प्रशासनाने कुठेतरी माझी ह्या कामाबद्दल दखल घेऊन माझ्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून सहानुभूती दाखवल्याबद्दल मी प्रशासनाचा आभारी आहे.
धन्यवाद 🙏 आपले असेच प्रेम, पाठिंबा आमच्या पाठीशी राहो ही सदइच्छा..??
खामदेव नाका व झाराप झिरो पॉइंट ही ६८ कोटीची कामे आमच्या पाठपुराव्यामुळे प्रगती पथावर आहेत…??
मात्र झाराप झिरो पॉइंट वर केवळ ९ कोटीच प्रवेश द्वार व सुशोभीकरण यांचे भूमी पूजन होऊन अद्याप का सुरू झाले नाही…? होणार की नाही हे सुद्धा माहित नाही..? ते काम मार्गी लावण्याची हिंमत दाखवा…? बांदा उड्डाण पूल पूर्ण झाले आहे तर झाराप झिरो पॉइंट व खामदेव नाका प्रगती पथावर आहेत…!? याचे आत्मपरीक्षण करा…🙏
कुठच्याही पक्षाच्या पदावर न काम करता व पदासाठी न धावता एक साधा नागरिक बनून देशाची व समाजाची सेवा करता येते हे आज समाजाला व बांदा वासियाना दाखवून दिले. आणि ज्यांनी त्यांच्या विरोधात नकारात्मक भूमिका घेतली त्यांना आपल्या मनोगतातून श्री आईर यांनी आपल्या कर्मट भाषेत खडे बोल सुनावले.