आताच शेअर करा

दिनांक: १७ मे २०२५

बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर 


श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व हिंदू एकता मंच बांदा यांच्या माध्यमातून
हिंदुत्वचे धगधगते अग्निकुंड
गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी हे जाहीर व्याख्यानाच्या निमित्ताने रविवार १८ रोजी बांदा शहरात येत आहेत. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व हिंदू एकता मंच बांदा यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात सायंकाळी ५ वाजता येथील आनंदी मंगल कार्यालयात गुरुजींचे जाहीर व्याख्यान होणार आहे.
रविवारी सायंकाळी ४ वाजता गवळीटेंब येथे गुरु कल्याणकर यांचे घरी चहापान त्यानंतर निमजगा येथील जि.प. शाळा रस्ता मार्गे हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाजवळ नमन व पूजन. तेथून हॉस्पिटल कट्टा,जि.प.शाळा नं.१ मार्गे बांदेश्वर मंदिर येथे दर्शन.तेथून जुन्या ग्रामपंचायत समोरून गांधीचौकमार्गे आनंदी मंगल कार्यालय,कट्टा कॉर्नर येथे सभेकरीता उपस्थित राहणार आहेत.यावेळी गुरुजींच्या हस्ते गोरक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे.नवीन उड्डाणपुलाखाली नामकरण करण्यात आलेल्या ‘श्रीराम चौक’ फलकाचे अनावरण करण्यात येणार आहे.
उपस्थित राहवे, असे आवाहन हिंदू एकता मंचकडून करण्यात.आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed