
दिनांक: ७ मे २०२५
बांदा ग्रामीण प्रतिनिधी: हेमंत मेस्त्री
वाफोली येथील जि.प.प्राथमिक शाळा नं.१ या शाळेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत.या शतकपूर्ती निमित्त शतक महोत्सव गुरुवार दि.८ व शुक्रवार दि.९ मे रोजी आयोजित केला आहे.यानिमित्त
सकाळी ८ वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे.सकाळी १० वाजता मान.खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री श्री नारायणराव राणे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री नितेश राणे (मत्स्य विकास मंत्री, महाराष्ट्र तथा पालकमंत्री (सिंधुदुर्ग)लाभले आहेत.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे (माजी शालेय शिक्षण मंत्री)श्री दीपक केसरकर, आमदार कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ श्री निलेश राणे, अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.श्री मनीष दळवी,मा.शिक्षण व आरोग्य जि.प. सिंधुदुर्ग,युवराज सावंतवाडी संस्थान श्री लखनराजे भोसले,माजी उपसभापती पं.समिती सावंतवाडी,श्री विनायक दळवी, जिल्हाप्रमुख शिवसेना (शिंदे गट)श्री संजु उर्फ सच्चिदानंद परब, विधानसभा प्रमुख शिवसेना (उबाठा)श्री रुपेश राऊळ,गटविकास अधिकारी पंचायत समिती सावंतवाडी श्री वासुदेव नाईक, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सावंतवाडी श्रीमती कल्पना बोडके, पोलीस उपनिरीक्षक बांदा विकास बडवे, केंद्रप्रमुख केंद्र बांदा श्री नरेंद्र सावंत,सरपंच ग्रामपंचायत वाफोली श्री उमेश शिरोडकर, मुख्याध्यापिका जिल्हा परिषद शाळा वाघोली नंबर १.श्रीमती सुनयना देसाई यांची उपस्थिती असणार आहे.
सकाळी १०.३० वाजता स्मरणिका प्रकाशन,दुपारी १ ते ३ महाप्रसाद, सायं.३.३० वा.मनोरंजनात्मक कार्यक्रम.उद्घाटन श्री डी.बी.वारंग (माजी अध्यक्ष – सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ बांदा) यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती श्री मारुती राजाराम गवस(माजी सरपंच वाफोली),श्री बापू तुकाराम गवस (अध्यक्ष वापोली हितवर्धक ग्रामस्थ संस्था मुंबई),श्री सुहास ढवळे,ज्ञानेश्वर खांबे (प्रतिनिधी श्री भावदेवी भजन मंडळ,दहिसर) सायं.५ वा.सुश्राव्य भजन कार्यक्रम
(श्री भावदेवी भजन मंडळ दहिसर – टीव्ही कलाकार श्री अनिल गवस मित्र मंडळ मुंबई),सायं ७ वा.सांस्कृतिक कार्यक्रम – माजी विद्यार्थी आणि महिला बचत गट, उद्घाटक सौ. धनश्री विलास गवस (विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.वाफोली)या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीकृष्ण ल. गवस (अध्यक्ष – शाळा व्यवस्थापन समिती वाफोली, श्री हरी रामा गवस देवस्थान प्रमुख वाफोली,श्री विनेश कृष्णा गवस उपसरपंच वाफोली लाभले आहे. शुक्रवार दि.९ मे रोजी सकाळी ८.३० वा.रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.रक्तदान शिबिरासाठी उद्घाटक म्हणून श्री प्रकाश तेंडोलकर यांची उपस्थिती असणार आहे.तर श्री शिवाजी गवस(माजी सरपंच वाफोली),श्री विलास गवस (अध्यक्ष – देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती वाफोली),श्री सतीश द.गवस (अध्यक्ष – तंटामुक्त गाव समिती वाफोली)श्री आना गवस (पोलिस पाटील वाफोली)यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.दुपारी ३ वा.श्री रुपेश पाटकर (मानसोपचार तज्ञ बांदा) यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.सायं.४ वा.आम्ही बाल कवी संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र गोसावी यांचा आजचा विद्यार्थी आणि पालकांची मानसिकता या विषयावर कार्यक्रम तर सायं.५ वा.शाळेचे माजी विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून वाफोली गावातील माजी शिक्षक सौ.स्नेहलता दत्ताराम वारंग,श्रीमती सुहासिनी आपा गवस,श्रीमंत सुप्रिया भालचंद्र सावळ,श्री बाबा बापू आईर व श्री अशोक कृष्णा गवस लाभले आहेत.सायं.७ वा.श्री गुणेश गवस दिग्दर्शित “गेले भजनाक पोचले लग्नाक” (स्थानिक कलाकारांचे मालवणी तुफानी विनोदी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या शतक महोत्सव कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रक म्हणून शतक महोत्सव समिती अध्यक्ष श्री मनोहर लक्ष्मण गवस,जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वाफोली नं.१,आणि वाफोली ग्रामस्थ यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
