
दिनांक: ७ मे २०२५
सातार्डा प्रतिनिधि: संदीप कवठणकर
माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या घरी कामानिमित्त प्रमोद प्रभुदेसाई हे गेले होते.कणकवली येथील ओटव गावचे रहिवासी असून आपली मारुती अल्टो कार गाडी क्रमांक एम एच ०७ ए जी ४९८५
या गाडीतून आपले काम संपवून तिरोडा तीठाच्या दिशेने येत असताना तिरोडा तीटा येते मेन रोड वरून क्रॉस करत असणारे गाडी क्रमांक एम एच ०७ ए ई ६२७७ रॉयल एनफिल्ड बुलेट घेऊन मळेवाड येथील व्यवसायिक प्रकाश राऊत हे व बायको व त्यांची मुलगी शिरोडा दिशेने मार्गस्थ होत असताना अचानक अल्टो कार आणि रॉयल इन्फिल्ड या गाडीमध्ये धडक झाली.
श्री प्रकाश राऊत व त्यांची पत्नी यांना जबरदस्त मार लागला आहे. दुर्दैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. ही घटना घडली त्यावेळी आजगाव येथील पोलीस पाटील सौ. निकिता नितीन पोकरे हे घटनास्थळी उपस्थित होते.
पोलीस पाटील यांनी वारंवार पोलिसांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण आज रेडी येथे मोपटेल चालू असल्या कारणामुळे पोलीस यंत्रणा तेथे व्यस्त होती. त्यामुळे पोलिसाना घटनास्थळी येण्यास विलंब झाला. पण तेथील ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रयत्नाने त्यांना १०८ मधून लगेच बांबोळी येथे पाठवण्यात आले. पुढील तपास पोलिस यंत्रणा करत आहे.
