
दिनांक: ४ मे २०२५
भेडशी प्रतिनिधी: गौरी नाईक
मोरगांव येथील श्री देव म्हातारा बाबा वर्धापन दिन सोहळा मे महिन्याच्या प्रथम सोमवारी साजरा होत आहे. त्या निमित्त खालील प्रमाणे भरघोस अशी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. सकाळी ८:०० वाजता श्री देवी माऊली पंचायतन देवतांचे समारंभस्थळी आगमन. सकाळी ९ ते ९:३० वाजता मूळस्थानी व मंदिरात अभिषेक १० ते १२ वाजता सत्यनारायण पूजा त्यानंतर महाआरती.१ ते ४वाजेपर्यंत महाप्रसादत्या नंतर मोरगांव ग्रामस्थांचे भजन, पावणी कार्यक्रम,७ ते ७:३० सांज आरती.८ ते ९:३० स्वरधारा भजन मंडळ तांबोळी श्री. अमित तांबोळकर यांचे सुस्वर भजन आणि रात्री १० वाजता कलेश्वर दशावतार पारंपरिक नाट्य मंडळ नेरूर प्रस्तुत ट्रिकसीन युक्त नाट्यप्रयोग “त्रिखुर ब्रह्मांड प्रलय” हा नात्यात प्रयोग साजरा होणार आहे. तरी समस्त भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मोरगांव ग्रामस्थ व श्री देव म्हाताराबाबा देवस्थान कमिटी मोरगांव यांनी केला आहे.