आताच शेअर करा

दिनांक: २ मे २०२५

सातार्डा प्रतिनिधि: संदीप कवठनकर

श्री वंसदेव मंदिराच्या जीर्णोद्धारचा व कलशारोहणाचा तृतीय वर्धापन दिन सोहळा शुक्लपक्ष षष्ठी ३ मे २०२५ या शुभ दिनी संपन्न होत आहे. या शुभ दिनाचे अवचित्य साधून शनिवार दिनांक ३ मे २०२५ रोजी सकाळी ८ :००वाजता अभिषेख ९:०० वाजता सत्यनारायण पूजा.

त्यानंतर महाआरती दुपारी महाप्रसाद, संध्याकाळी ६:०० वाजता मूळ पुरुष प्रसादिक भजन मंडळ वेंगुर्ला यांचे सुस्वर भजन, रात्री १०:०० वाजता तेंडुलकर दशावतार नाट्य मंडळ झाराप, कुडाळ यांचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. दिनांक: ४ मे २०२५ रोजी ४ वाजता महिला व मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री १० :०० वाजता गोंधळाचा कार्यक्रम साजरा होणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन समस्त पंडित परिवाराकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed