आताच शेअर करा

दिनांक: ४ मे २०२५

बांदा / प्रतिनिधी:

मडूरा ग्रामदैवत श्री  देवी माऊली वर्धापनदिन सोहळा सोमवार ५ मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्रींची पूजाअर्चा व अभिषेक, त्यानंतर श्रीसत्यनारायण महापूजा, दुपारी महाआरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. सायंकाळी स्थानिकांची भजने होतील. 
    रात्री १० वाजता मडुरा देऊळवाडी तरुण हौशी नाट्यमंडळ आयोजित ‘राखणदार’ हे दोन अंकी मालवणी नाटक होणार आहे. यात  राजाराम परब, प्रसाद परब, घनश्याम परब, नितीन नाईक, आनंद परब, प्रवीण मांजरेकर, निलेश परब, आकाश केरकर, सिताराम नाईक, सावळाराम पांचाळ, सागर केरकर, सुधीर नाईक, सर्वेश केरकर, प्रितेश गवंडी, बापू केरकर, मुन्ना परब, रोशन केरकर, वासुदेव नाईक, निश्चय नाईक, लक्ष्मण पेडणेकर, साहिल परब, गौरव परब, पंढरी सातार्डेकर, रोहन केरकर, विश्वजीत परब, वरद परब, वेदांत परब, मुन्ना नाईक, कृष्णा शेट्ये, करण शेट्ये, ईशा माळकर व गीताली मातोंडकर यांच्या भूमिका आहेत. भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे.
——-
फोटो – मडुरा माऊली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *