
दिनांक: २ मे २०२५
बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर
काश्मीर येथे पहलगाम हल्ल्यात निष्पाप बळी गेलेल्या पर्यटकांना आज बांदा शहरातील मुस्लिम बांधवानी श्रद्धांजली व्यक्त केली. पाकिस्तानाच्या या कृत्याचा जाहीर निषेध करत पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला.
आज दुपारी मशिदीत नमाज पठण केल्यानंतर सर्व मुस्लिम बांधवानी एकत्र येत दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध केला. भारतातील सर्व धर्मीय एक असून पर्यटकांवर केलेला हा हल्ला देशाच्या एकात्मतेवर हल्ला असून या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करत असल्याचे रियाज खान यांनी सांगितले. यावेळी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करत त्यांचा ध्वज जाळण्यात आला.
यावेळी रियाज खान, रझाक खान, सुलेमान शेख, मुश्ताक खान, आसिफ शेख, अजमुद्दिन शेख यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो:-
बांदा येथे पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी करताना शहरातील मुस्लिम बांधव.