आताच शेअर करा

दिनांक: ३० एप्रिल २०२५

(दोडामार्ग) भेडशी प्रतिनिधी: गौरी नाईक.

दोडामार्ग तालुक्यातील सोनावल येथे पुरातन श्री सातेरी देवी व भूतनाथ मंदिराचा शिखर कलशारोहण व लिंगेश्वर मंदिरातील शिवलिंग पुन: प्रतिष्ठापना सोहळा तिथी वैशाख शुद्ध पक्ष श्री शालिवाहन शेटे  १९४७ बुधवार दिनांक ३० एप्रिल पासून या कार्यक्रमास सुरुवात झाली असून गुरुवार दिनांक १ मे २०२५ व शुक्रवार दिनांक २ मे २०२५ रोजी ब्राह्मण पुरोहित यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

वतरी या कार्यक्रमाला उपस्थित राहून श्री कृपेला पात्र व्हावी अशी विनंती श्रीदेवी सातेरी भूतनाथ पंचायतन कमिटी, सोनावल व समस्त सोनावल ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात आली आहे.बुधवार दिनांक ३० एप्रिल रोजी धार्मिक विधी पार पाडले. कीर्तन, नाटक असे बहारदार कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली.उद्या दिनांक १ मे रोजी धार्मिक: विधी प्रकार, शुद्धी स्नान, विधी वास्तुहोम, मुख्य देवता होम ,इतर देवतांची शुद्धीकरण विधी,शिखर कलश शुद्धीकरण होम शांतीपाठ, दुपारी महाप्रसाद, संध्याकाळी ३ वाजता रांगोळी प्रदर्शन, ४ वाजता महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम ६ वाजता श्री महारुद्र हनुमान घुमट आरती मंडळ पर्वरी गोवा यांची घुमट आरती, रात्र ८:०० वाजता माऊली भजन मंडळ यांचे सुश्राव्य भजन तसेच रात्री ९:३० वाजता मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम शुक्रवार दिनांक २ मे २०२५ रोजी सकाळी आठ वाजता दिंडी श्री सातेरी दिंडी पथक विर्डी. सकाळी ९:०० वाजता धार्मिक विधी, १० वाजून ५६ मिनिटांनी महादेव लिंग स्थापना, बलिदान पूर्णाहुती,आरती, गाऱ्हाणे , ओठी भरणे  व तीर्थ प्रसाद दुपारी २:०० वाजता महाप्रसाद होईल. संध्याकाळी ७:०० वाजता स्वरधारा प्रसादिक भजन मंडळ तांबोळी बुवा श्री अमित तांबोळकर यांचे मधुर भजन. रात्री ठीक १०:०० वाजता श्री सातेरी देवी भूतनाथ नाट्य मंडळ सोनावल यांचा लेखक श्री कमलाकर बोरकर लिखित तीन अंकी संगीत नृत्यमय, काल्पनिक, ऐतिहासिक नाट्य प्रयोग “लाखण” सादर करण्यात येणार आहे तरी नाट्य होशी कलावंतांनी व प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती पंचायतन कमिटी सोनावल यांच्याकडून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *