आताच शेअर करा

दिनांक: ३ एप्रिल २०२५

सिंधुदुर्ग: संपादकीय

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुशिक्षित तरुणाच्या रोजगाराचा प्रश्न नेहमीच चिंतेचा बनत चालला आहे.
तरी जिल्ह्यातील काही तरुण वर्ग , लागून असलेल्या गोवा राज्य मध्ये _”पोटाची खळगी”_ भरण्यासाठी जात असतात.

अनेक गोष्टीचा सामना करून या ठिकाणी उदर निर्वाह ते करतात.

गगनाला भिडत असलेली महागाई आणि या ठिकाणी राहण्याचे भाडे सर्व सामान्य नोकर वर्गाला परवडत नसल्याने कित्येक तरुण रोज घरून ये जा करण्याचा मार्ग निवडतात.

त्याच अनुषंगाने वेरणा येथील GIDC मध्ये जाण्या साठी रेल्वेची महत्वाची भूमिका आहे.नेहमी वेरणा स्थानकावर कोंकणकन्या रेल्वे थांबायची मध्यंतरीच्या काळात ती रेल्वे प्रशासनाने न थांबण्याचे जाहीर केल्या मुळे असंख्य नोकर वर्गाचे हाल होऊ लागले.

याच्या साठी पुन्हा ती रेल्वे स्थानकावर थांबण्या बाबत आज तेथील नोकर वर्गा कडून संबंधित रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

रेल्वे युनियन कर्मचारी वर्गाची या ठिकाणी महत्वाच योगदान मिळाले. पुढील सर्व गोष्टींची पूर्तता रेल्वे कामगार संघटना करणार आहे.

_त्या वेळी  *शिवराम खानोलकर, ओंकार पाटणकर, आशिष मेस्त्री, आदेश सावंत मंदार पार्सेकर आदी.उपस्थित होते.*_

अनेक तरुण तरुणीचा आणि नोकरवर्ग यांचा सह्या स्वरूपात पाठिंबा मिळाला . त्या सर्वाचे *”ओंकार पाटणकर”* यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *