
केरी पेडणे येथील न्यू इंग्लिश हायस्कुलच्या नूतन शालेय बसच्या लोकांर्पण सोहळ्यानिमित्त उपस्थिती मान्यवर, पालक, शिक्षक वं विध्यार्थी.
दिनांक: १ फेब्रुवारी २०२५
(गोवा) हरमल: प्रतिनिधि
केरी तेरेखोल परिसर विकास कल्याण आणि शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश हायस्कुलच्या नवीन स्कुल बसने लोकार्पण आज गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले.
सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष व्रजेश केरकर यांच्या हस्ते नव्या शालेय बसचे विधिवत पूजन करण्यात आले.
तत्पूर्वी शालेय प्रांगणातील गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्यास अध्यक्ष व्रजेश केरकर, उपाध्यक्ष विठ्ठल गडेकर, संगीत विद्यालय व्यवस्थापक आनंद शिरगांवकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
बसच्या लोकांर्पण सोहळ्यास शाळेचे व्यवस्थापक शैलेंद्र कुबल, खजिनदार मिलिंद तळकर, अरुण वस्त, राहुल बर्मन, हायस्कुलच्या पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष अमृत पेडणेकर, उपाध्यक्ष संजना तळकर, प्राथमिक विभाग पालक शिक्षक अध्यक्ष प्रज्योती वस्त, अन्य कार्यकारी मंडळ पदाधिकारी, महाराष्ट्र व गोव्यातील पालक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या प्रसंगी उपस्थिती होते.
अध्यक्ष व्रजेश केरकर यांच्या हस्ते केरी युनियन बँकेचे व्यवस्थापक राहुल बर्मन यांचा विशेष गौरव करण्यात आला.
न्यू इंग्लिश शाळेच्या पालक व विद्यार्थ्यांची वाहतुक सुरळीत वं सुरक्षित व्हावी या उद्देशाने शाळेने नवीन बस उपलब्ध केली असून भविष्यात पालकांनी शाळेवर आपले प्रेम व आपुलकी अशीच ठेवावी आणि शाळेच्या भरभराटीसाठी कार्यरत रहावे असे आवाहन अध्यक्ष व्रजेश केरकर यांनी या प्रसंगी बोलताना केले.
मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर यांनी शेवटी आभार मानले. पालक शिक्षक व विद्यार्थी मिळून केरीचे ग्राम दैवत श्री रवळनाथ व श्री आजोबा देवाचे दर्शन घेतले.