आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधी : अक्षय मयेकर

दिनांक: २२ जानेवारी २०२५

झाराप झिरो पॉईंट ते बांदा पत्रादेवी पनवेल (एन एच ६६ )या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. वाहन चालकांना वाहन चालवणे त्रासदायक होत होते. या खड्ड्यामुळे भविष्यात महामार्गावर मोठा अपघात होण्याचे शक्यताही होती.  हे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाला मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत आणि सावंतवाडी तालुक्यातील कार्यकर्ते यांच्या माध्यमातून महामार्गावरील खड्डे येत्या पंधरा दिवसात तातडीने बुजवावेत असे निवेदनातून  लेखी स्वरूपात आवाहन केले होते.

मागणी पूर्ण न झाल्यास मनसे स्टाईलमध्ये आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला होता पण संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन अवघ्या दहा दिवसातच रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा व डांबरीकरणाच्या कामास सुरुवात केली आहे. त्यामूळे संबधित प्रशासनाचे मनसे तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत यांनी आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed