
तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे
दिनांक:२२ जानेवारी २०२५
वेंगुर्ला पोलीस विभाग व ग्रामपंचायत शिरोडा यांच्या संयुक्त विद्यमानाने मंगळवार दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह ग्रामपंचायत शिरोडा येथे ग्राम संवाद हा कार्यक्रम संदीप भोसले पोलीस निरीक्षक वेंगुर्ला यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
सुरुवातीला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रमोद नाईक यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी विविध गुन्हे लोकांना कसे फसविले जाते ,फेक मेसेज या संबधी माहिती दिली या कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप भोसले यांनी सायबर गुन्हे डायल ११२ वाहतूक कोंडीची समस्या याबरोबरच गावातील शहरातील विविध समस्या व त्यावरील उपाययोजना याबाबत चांगली माहिती दिली. कोणतीही समस्या असेल तर पोलिस यंत्रणा कायम सहकार्य करेल अशी त्यांनी ग्वाही दिली. त्यानंतर मोबाईलचे फायदे व तोटे त्याचा वापर, मोबाईल वरील कॉल, फेक मेसेज तसेच फेसबुकचा वापर करताना आपली फसवणूक होणार नाही याबाबतीत प्रत्येकाने तत्पर राहिले पाहिजे. अनोळख्या व्यक्तीचे व्हिडिओ कॉल व अनोळख्या कॉलवर कोणालाही आपली वैयक्तिक माहिती देऊ नये. अशी विनंती शिरोडा कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर श्रीराम दीक्षित यांनी आपल्या मनोगतातून केली.
यानंतर जागतिक क्षयरोग दिनाच्या पार्श्वभूमीवर शिरोड्याच्या आरोग्य सेविका सौ संध्या रेडकर यांनी क्षय रोगाची माहिती दिली क्षयरोगाची लक्षणे, उपाययोजना, तपासण्या, घ्यावयाची काळजी व औषधे याबाबत संग्रह माहिती दिली व त्यानंतर क्षयरो (T. B.) निर्मूलना बाबतची शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमात शिरोडा ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री चंदन हाडकी, सर्व ग्रामपंचायत सदस्य श्री पांडुरंग नाईक ,राजन धानजी प्रथमेश (बंड्या) परब, जगत बांदेकर, सुधीर नार्वेकर, सौ शितल
नाईक,सौ. रश्मी डीचोलकर, सौ. अनुष्का घोडकर तसेच शिरोडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मनोज उगवेकर माझे तंटामुक्ती गाव अध्यक्ष प्रमोद नाईक, माजी ग्रामपंचायत सदस्य अमित गावडे भाजी मार्केट मक्तेदार प्रवीण मसुरकर तसेच आरोग्य सेविका सौ संध्या रेडकर व सहकारी आशा व अंगणवाडी सेविका शिक्षक, शिक्षिका शिरोडा पोलीस पाटील लक्ष्मण तांडेल, सौ.प्राची पेडणेकर, पोलीस पाटील खालची केर सौ. मिताली शेट्ये, पोलीस पाटील गांधीनगर पांडुरंग पडवळ, पोलीस पाटील वरची केरवाडी संजय मोरजकर, पोलीस पाटील सखैले खोल पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री. राऊळ अनंत हडकर, मंडल निरीक्षक निलेश मयेकर विविध खात्याचे अधिकारी व कर्मचारी शिरोडा कॉलेजचे प्राध्यापक ओऊळकर सर व कॉलेजचे विद्यार्थी शिरोडा येथील ग्रामस्थ तसेच शिरोडा ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचा शिरोड्यातील असंख्य ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते यांनी लाभ घेतला.या कार्यक्रमात उपस्थित ग्रामस्थांनी विविध समस्या व चर्चा केली व त्यावर उपाययोजना करण्याचे ठरवले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रमोद नाईक यांनी केले तर आभार डॉक्टर श्रीराम दीक्षित यांनी मानले.
