
(गोवा) पेडणे :प्रतिनिधि
दिनांक १८ जानेवारी २०२५
पेडणे तालुक्यातील सर्व क्षेत्रातील कलाकारांना त्यांच्या हक्काचे त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे. शिवाय ज्या पद्धतीने राज्यात कला आकादमीचे थेटर आहे.त्याच धर्तीवर सुसज्ज असे रवींद्र भवन तुये सरकारी जागेमध्ये उभारण्यात येणार आहे. त्यासाठी कलाकारांनी रवींद्र भवन त्यामध्ये वास्तू रचनेत कशा पद्धतीचा बदल हवा, त्या सूचना पेडणे तालुक्यातील सर्व कलाकारांनी कराव्यात असे आवाहन मांद्रे मतदार संघाचे आमदार जीत आरोलकर यांनी आपल्या कार्यालयात पेडणे तालुक्यातील निवडक कलाकारांची एक महत्वाची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी कलाकारांना माहिती देताना आवाहन केले.
पेडणे तालुक्यासाठी कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी एकूण 50 हजार चौरस मीटर जागेमध्ये भव्य दिव्य असे रवींद्र भवन उभारण्यात येणार आहे. आणि त्यासाठी सरकारने कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री सर्व संबंधिताने मंजुरी दिल्याची माहिती आमदार जीत आरोलकर यांनी दिली. या रवींद्र भवन मध्ये पेडणे तालुक्यातील पर्यायाने राज्यातील अनेक कलाकारांना कसल्या प्रकारच्या सोयी सुविधा महत्त्वाच्या सूचना करण्याची गरज असल्याचे सांगून या रवींद्र भवन मध्ये एकूण चार थेटर एक ओपन रंगमंच त्यासाठी जाहीर कार्यक्रमाचेही आयोजन शिवाय प्ले गार्डन वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना असल्याचे आमदार जीत आरोलकर म्हणाले.
या बैठकीला राजमोहन शेट्ये, निवृत्ती शिरोडकर उमेश गाड नरेंद्र नाईक, हरी शेटगावकर, उमेश आगरवाडेकर, प्रसन्न कुमार शेटगावकर, सुभाष आसोलकर, पाऊल डिसूजा, महादेव हरमलकर, दत्ताराम ठाकूर, योगेश काळोजी, सागर तिळवे, संजय मयेकर ,आयरिश डिसूजा, विलास परब, निलेश नाईक, आयरिश फर्नांडिस आदी कलाकार यावेळी उपस्थित होते.
तुये इथे होणाऱ्या रवींद्र भवन परिसरात वेगवेगळ्या कलाकारांसाठी सोयी सुविधा बरोबरच परराज्यातील जे प्रशिक्षक शिक्षक कलाकार येतील. त्यांना राहण्यासाठी तारांकित सोयही या रवींद्र भवन मध्ये केली जाणार. विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाण्याची सोय असेल, शिवाय गुरुकुल पद्धतीने नुसार कलाकारांना वेगवेगळे शिक्षण देण्याची ही सोय या रवींद्र भवन मध्ये असणार आहे. शिवाय इतर सोयी सुविधा उपलब्ध होतील. कलाकारांना ज्या काही सूचना करायचा असेल, किंवा एखादा बदल करायचा असेल ,तर त्यांनी आपल्याकडे संपर्क साधावा. असे आवाहन यावेळी आमदार जीत आरोलकर यांनी केले.
यावेळी उपस्थित असलेल्या कलाकाराने आमदार जीत आरोलकर यांनी रवींद्र भवन साठी सरकार दरबारी प्रयत्न केल्यामुळे कलाकारांचे स्वप्न पूर्ण होत असल्यामुळे कलाकारांनी त्यांचे अभिनंदन केले. सतत पाठपुरावा करून भव्य दिव्य स्वप्न साकार होत असल्याने हे पेडण्यासाठी एक भूषण आहे. असे मत कलाकार राजमोहन शेट्ये यांनी व्यक्त केले.
पेडणे तालुक्यात कलाकारांसाठी होणारे रवींद्र भवन हे अनेक साधन संविधानी सुसज्ज असावे,जेणेकरून पेडणे तालुक्यातील कोणताही कलाकार कोणतीच कला सादर करण्यापासून वंचित न राहणे यासाठी वास्तूचे नियोजन करणे शिवाय वास्तूमध्ये लहान मुलं विद्यार्थी आजचे युवा कलाकार जेष्ठ नागरिक ते प्रसिद्ध कलावंत व नागरिकांना व्यासपीठ मिळून मनोरंजन ते व्यवसायिक मोठे होण्यासाठी या वास्तूचे नियोजन करावे. तालुक्यातील कलाकारांना यात सामावून घेण्यासाठी आमदारांनीही प्रयत्न केले आणि आम्हाला ग्वाही दिली त्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो असे मत यावेळी कलाकारांनी व्यक्त केले.
राजमोहन शेट्ये यांनी यावेळी मत व्यक्त करताना रंगकर्मीचा लढा खऱ्या अर्थाने सार्थकी लागला. जवळजवळ सर्वच ग्रामपंचायतीने दिलेली यथोचित सहकार्य आणि नियोजनबद्ध अगदी विधानसभा ते सरकारी कार्यालयात केलेली आमदाराने केलेले पाठपुरावा म्हणजे साकार होणारे रवींद्र भवन होय. पेडणे तालुक्यातील तमाम कलाकारांमध्ये आनंद उत्सव साजरा होत असल्याचे मत यावेळी राजमोहन शेट्ये यांनी व्यक्त केली.
निवडलेली कलाकारांची अस्थायी ही समिती कला अकादमी ते गोव्यातील सर्व रवींद्र भवनची पाहणी करून वास्तू रचने हवा तो बदल करण्याची सूचना यावेळी आमदार जीत आरोलकर यांनी उपस्थित कलाकारांना केली.
या रवींद्र भवन मध्ये पेडणे तालुक्यातील सर्व साहित्यिक यांची नाटकाची व इतर पुस्तके आहेत, ती पुस्तके या ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी एक चांगली लायब्ररी उपलब्ध व्हावी असे मत यावेळी कलाकारांनी व्यक्त केले.