आताच शेअर करा

सिंधुदुर्ग संपादकीय

दिनांक: १४ जानेवारी २०२५

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या ६ जानेवारी रोजी नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार समारंभात नाशिक येथील श्री समर्थ फिजिओथेरपी सेंटरच्या संचालिका डॉ. पारुल सुनील महेंद्रु यांच्या वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार राजस  कन्स्ट्रक्शनचे संचालक राजेश उपासनी, भाजप प्रवक्ते व लोकप्रिय अँकर अजित चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस  अँड.नितीन ठाकरे, गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण, भाजपचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, उत्तर महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी- निशिगंधा कापडणीस, मॉडेल व मिसेस मलेशिया इंटरनॅशनल डॉ. ज्योती केदारे – शिंदे, रोटरी क्लब नाशिकचे अध्यक्ष ओम प्रकाशजी रावत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश आदी राज्यातून पुरस्कारर्थी आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *