आताच शेअर करा
फोटो :विजय देसाई.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर

दिनांक: १४ जानेवारी २०२५

डेगवेतील बीएसएनएल मोबाईल टॉवर येत्या दोन दिवसात ४जी सेवा सुरू होणार आहे. यासाठी मोबाईल टॉवरचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. शिवसेना शिंदेसेनेचे उपविभाग प्रमुख आणि डेगवे ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई यांनी ग्रामस्थांना पूर्णवेळ हाय स्पीड इंटरनेट उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा केला होता. बी एस एन एल ही एकमेव मोबाईल सेवा किफायतशीर दरात गावात बहुतांश भागात उपलब्ध होत असल्याने ४जी सेवा उपलब्ध होणे ही गरज होती. आता गावच्या विकासासाठी अनेक मार्ग उपलब्ध होणार असून ७५ टक्के काम पूर्ण आहे. अशी माहिती विजय देसाई यांनी यांनी दिली. सर्व शासकीय सेवा ग्रामपंचायत, तलाठी तसेच डेगवे सोसायटी आणि शाळातसेच व्यावसायिक यांना २जी/३जी सेवेमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. डेगवे ग्रामस्थांच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा, आंदोलन तसेच उपोषण देखील केले गेले होते. जलद इंटरनेट सेवा उपलब्ध झाल्याने सर्व स्तरातील ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरण वतीने सर्व मोबाईल सेवा पुरवठा दार कंपन्यांना जानेवारी अखेरपर्यंत मोबाईल इंटरनेट, एस एम एस तसेच फोन करण्यासाठी स्वतंत्र रिचार्ज प्लान जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत तसेच एक वर्ष कालावधीचे सिम कार्ड वैधता अत्यावश्यक करण्यात आली आहे. यामुळेही ग्रामीण भागातील शेतकरी, असंघटित क्षेत्रातील मजूर, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच व्यावसायिक यांना ४जी सेवा उपलब्ध झाल्यानंतर अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *