आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधि : अक्षय मयेकर

दिनांक: १३ जानेवारी २०२५

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली व राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय रंगोत्सव कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांदा पानवळ या शाळेला सर्वोत्तम अध्ययन अध्यापन कृती म्हणून सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन उपसंचालक डाॅ.आय.पी.नदाफ यांच्या हस्ते गौरवण्यात आले
            रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत अनुभवात्मक अध्ययन आधारित उत्कृष्ट अध्ययन कृतीसाठी जिल्हास्तर ,विभाग स्तरावर बाजीमारत बांदा पानवळ शाळेने राज्यस्तरावरही आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अटकेपार विजयाचा झेंडा रोवत आपली राज्यस्तरावर मोहर उमटवली. यावेळी शिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार( भा.प्र.से.) याने मुलांच्या अध्ययन कृतीसाठी विशेष कौतुक करून रंगोत्सव कार्यक्रमात आणखीच रंगत आणत अभिनंदन केले .सहसंचालक श्रीम अनुराधा ओक यांच्या शुभेच्छा प्रेरणादायी ठरल्या असून कला व क्रीडा विभागाचे उपसंचालक डॉ. आय.पी. नदाफ याने मुलांच्या आत्मविश्वास सादरीकरणाबाबत कौतुक कले. तर विषय विभागप्रमुख सचिन चव्हाण यानी बांदा पानवळ शाळेतील आर्यन आणि मुग्धा या पहिलीतील विद्यार्थ्यांचे सर्वात उत्कृष्ट बाल कलाकार म्हणून कौतुकानी शाबासकी दिली.
         इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतच्या या गटात बांदा पानवळ सिंधुदुर्ग हा सर्वात लहान मुलांचा चमू खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरला.
अनुभवात्मक अध्ययनाची गरज विचारात घेऊन आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्जनशील अध्यापन शास्त्रीय पद्धतीचा वापर करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांदा पानवळ शाळेतील शिक्षक तथा साहित्यिक कवी मनोहर परब , सुनीता कदम आणि विद्यार्थ्यांनी अनुभवात्मक अध्ययन आधारित उत्कृष्ट अध्ययन अध्यापन कृती एसीईआरटी पुणे येथे सादर करून राज्यस्तरीय रंगोत्सवात खरी रंगत आणून सिंधुदुर्गाच नाव महाराष्ट्रात पुढे आणून जिल्हा परिषद शाळा बांदा पानवळ या शाळेने आपली ओळख महाराष्ट्रात निर्माण केली आहे .
         राज्यस्तरीय रंगोत्सवात महाराष्ट्रातील चोवीस संघाने एकापेक्षा एक सादरीकरण केले त्यात बांदा पानवळ शाळेने आपले उत्कृष्ट सादरीकरण करून सर्वांचेच लक्ष वेधून सर्वोत्तम सादरीकरण ट्रॉफीचे मानकरी झाले.
रंगोत्सवातून दर्जेदार अध्ययन अध्यापन उत्कृष्ट कृतीचा महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना मार्गदर्शक म्हणून एससीईआरटीच्या वेबसाईटवरून व्हिडिओ प्रकाशित केला जाईल .बांदा पानवळ या प्रशालेची सर्वोत्तम अध्ययन अध्यापन कृती महाराष्ट्रासाठी आयडॉल ठरली आहे .यातून नवीन शैक्षणिक धोरणाचा विचार ,अध्ययन निष्पत्ती ,निपुण या सर्व बाबींचा विचार करून हसत खेळत प्रभावी अध्यापन शिक्षकाने करणे आवश्यक असून महाराष्ट्रातील आयडॉल शाळा बांदा पानवळ शाळेने खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली
          यावेळी बांदा ग्रामपंचायत सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच राजाराम सावंत, श्यामसुंदर मांजरेकर, साईप्रसाद काणेकर, दीपलक्ष्मी सावंत याने शुभेच्छा देऊन सहकार्य केले.तर बांदा शहर भाजपच्या वतीने आर्थिक सहकार्य केले, तसेच साईप्रसाद काणेकर, शशिकांत पित्रे, वीरेंद्र आटलेकर यांचे आर्थिक सहकार्य लाभले यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच राजाराम सावंत यांनी सर्व विद्यार्थ्यांना ओळखपत्रे दिली. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आरती सावंत ,मनोज गुळेकर ,समीर पेळपकर, रेश्मा वरक, अपर्णा मरळ ,ऋतुजा हडफडकर, योजना साहिल, नेत्रा शिंदे ,कविता मांजरेकर, कृष्णा मांजरेकर,देवयानी  डेगवेकर, मैथीली सावंत यांचेही सहकार्य लाभले राज्यस्तरीय रंगोत्सव कार्यक्रमात योग्य मार्गदर्शन डाएट प्राचार्य राजेंद्र कांबळे, ज्येष्ठ अधिव्याख्याता शाहीर बाबुराव कांबळे,  इतर अधिकारी वर्ग, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी प्रमोद पावसकर, केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले या राज्यस्तरीय उज्वल यशाबद्दल बांदा पानवळ शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *