बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर
दिनांक: १३ जानेवारी २०२५
विलवडे-मधलीवाडी येथे प्रतिवर्षाप्रमाणे सोमवारी १३ ते रविवार १९ जानेवारी या सात दिवस कालावधीत धालोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिल्या दिवशी सोमवारी सायंकाळि श्रीफळ ठेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर दर दिवशी भजने, महिलांचे विविध धार्मिक कार्यक्रम होतील. सहाव्या दिवशी शनिवारी दिनांक १८ रोजी सकाळी देवाचे वाजत गाजत पालखी, तरंगकाठी सहित आगमन, सायकांळी भजने, महिलांचे विविध कार्यक्रम, रात्रो १२ वाजता दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे
सातव्या रविवारी धालोत्सवाची सांगता होणार आहे. सकाळी देवाचा कोैल, दुपारी १ वाजता महाप्रसाद होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान मानकरी महादेव दळवी, दिगंबर दळवी, रामचंद्र दळवी यांच्यावतीने करण्यात आले आहे.