
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर
दिनांक: १२ जानेवारी २०२५
सावंतवाडी जिमखाना मैदान येथे तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत मुलींच्या खो-खो मोठ्या गटातून जि. प. पूर्ण प्राथ. शाळा विलवडे नं १ प्रशालेच्या मुलींच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत विजयी संघ जिल्हास्तरावर सावंतवाडी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. यावेळी संपूर्ण संघाचे प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी संघाचे तसेच मुख्याध्यापक मनोहर गवस, मार्गदर्शक शिक्षक सुष्मिता मांगले व पंडित मैंद यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.
तसेच विलवडे गावचे सरपंच श्री प्रकाश दळवी यांनी संपूर्ण संघाचा सत्कार करून पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या. मार्गदर्शक म्हणून शाळेचे मख्याध्यापक मनोहर गवस, पदवीधर शिक्षक पंडित मैंद, सुष्मिता मांगले,भारती देसाई यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.