आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर

दिनांक: १२ जानेवारी २०२५

बांदा पोलीस कर्मचारी व पत्रकार यांच्यातील मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यात पत्रकार संघाने बाजी मारली. पोलीस संघाने दिलेले आव्हान लीलया पार करीत पत्रकार संघाने सामना सहजरीतीने जिंकला. शेर्ला – आरोसबाग येथील मैदानावर हा सामना संपन्न झाला.

  बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या संकल्पनेतून पोलीस कर्मचारी व पत्रकार यांच्यातील मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी सामन्याची नाणेफेक केली. पोलीस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पोलीस संघाने निर्धारित ८ षटकात ६ गडी गमावून ५५ धावा जमविल्या. सिद्धेश माळकर यांनी ३ षटकार व चौकरासह २६ धावांचे योगदान दिले. प्रवीण परब यांनी २ षटकात ६ धावा देत ४ गडी बाद केले. तर अक्षय मयेकर, शैलेश गवस यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.

५६ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या पत्रकार संघाने शेवटच्या षटकात विजय संपादन केला. राजाराम धुरी यांनी दोन षटकार व दोन चौकारासह २१ धावांचे योगदान दिले. विराज परब, अक्षय मयेकर, प्रवीण परब, शैलेश गवस, जय भोसले यांनीही फलंदाजीत योगदान दिले. यावेळी आशुतोष भांगले, निलेश मोरजकर, यश माधव संघात सहभागी झाले होते.

पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले. फिटनेस व सुदृढ आरोग्यासाठी खेळ महत्त्वाचे आहेत. पोलिसां प्रमाणे पत्रकारही कायम व्यस्त राहतात. यातून विरंगुळा मिळावा यासाठी क्रिकेट सामन्याचे आयोजन केले होते असे सांगितले. आभार आशुतोष भांगले यांनी मानले.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *